Join us  

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष मेल, एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 5:10 AM

पुणे-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर दोन विशेष जादा फे-या चालविण्यात येतील.

मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोकणात जाणाऱ्या ६ गणपती विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-पनवेल या मार्गावर दोन विशेष फेºया चालविण्यात येतील. लोकमान्य टिळक टर्मिनसहून ३० आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.५० वाजता विशेष गाडी सुटेल. ती सकाळी ६.३० वाजता सावंतावाडी रोड येथे पोहोचेल. सावंतवाडी रोडहून सकाळी १०.५५ वाजता ती पनवेलसाठी रवाना होईल. ही गाडी पनवेल येथे रात्री ११.४० वाजता पोहोचेल.पनवेल-सावंतवाडी रोड-पुणे या मार्गावर दोन विशेष फे-या चालविण्यात येतील. पनवेलहून ३१ आॅगस्ट रोजी मध्यरात्री १२.५५ वाजता सुटेल. सावंतवाडी रोड येथे दुपारी २.१० वाजता पोहोचेल. ती सावंतवाडी रोडहून दुपारी ३.२० वाजता सुटून पुणे स्थानकात सकाळी ७.२५ वाजता पोहोचेल.या गाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.पुणे-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर दोन विशेष जादा फे-या चालविण्यात येतील. ही गाडी पुण्याहून २९ आॅगस्ट रोजी मध्यरात्री १२.१० वाजता सुटेल. ती पहाटे ४ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. सावंतवाडी रोड स्थानकातून ती सकाळी ५.२० वाजता रवाना होईल व लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर दुपारी ४.५० वाजता पोहोचेल.

टॅग्स :रेल्वे