मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेच्या दुसऱ्या संधीसाठी नोंदणीला विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह १५ आणि १६ एप्रिलला नोंदणी करता येईल.
सध्या पहिल्या संधीची पीसीएम समूहाची सीईटी परीक्षा सुरू आहे. तर, पीसीबी समूहाची सीईटी परीक्षा २१ एप्रिलपासून सुरू होत आहे. दुसऱ्या संधीसाठी तत्काळ नोंदणीचे आवाहन केले आहे.
कोण करू शकेल नोंदणी? ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली नाही, ते दुसऱ्या संधीसाठी नोंदणी करू शकतात.ज्यांनी दोन्ही संधींसाठी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.
दुसऱ्या संधीसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी एमएचटी पीसीएम समूह २,९६,५५३ एमएचटी पीसीबी समूह १,०४,७९७ एकूण ४,०१,३५०
Web Summary : MHT CET exam registration extended for PCM and PCB groups with late fee. Eligible candidates can register April 15-16. Those already registered need not re-register. PCM exam is ongoing; PCB starts April 21.
Web Summary : एमएचटी सीईटी परीक्षा के लिए पीसीएम और पीसीबी समूहों के लिए विलंब शुल्क के साथ पंजीकरण बढ़ाया गया। योग्य उम्मीदवार 15-16 अप्रैल को पंजीकरण कर सकते हैं। पहले से पंजीकृत लोगों को फिर से पंजीकरण करने की आवश्यकता नहीं है। पीसीएम परीक्षा चल रही है; पीसीबी 21 अप्रैल से शुरू होगी।