Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणची 1 सप्टेंबरपासून विशेष मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 19:39 IST

रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात राज्यभरात महावितरणच्या वतीने 01 सप्टेंबर 2018 पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार असून यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाऱ्या कंपनी विरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई- रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात राज्यभरात महावितरणच्या वतीने 01 सप्टेंबर 2018 पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार असून यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाऱ्या कंपनी विरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महावितरणच्या वतीने वीजचोरीवर आळा घालण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. वीजचोरी रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबवून मोठया प्रमाणात कारवाई करण्यात येते.परंतु अलीकडच्या काही वर्षात रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुंबईत आज 30 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा वीजचोरीच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्याचा व कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोहीम 01 सप्टेंबर 2018 पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत रिमोटद्वारे वीजचोरी करणारे ग्राहक तसेच संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी, अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रक्कमेच्या 10 टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून देण्यात येते. तसेच अशी माहिती देणाऱ्याचे नाव देखील गुप्त ठेवण्यात येते. त्यामुळे अशा वीजचोरीची माहिती देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.