तोल मोल के बोल
By Admin | Updated: September 28, 2014 22:30 IST2014-09-28T22:30:16+5:302014-09-28T22:30:16+5:30
गुजरातपेक्षा महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली आहे. महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. गुजरातच्या तुलनेत आपल्यावर कर्ज कमी आहे. विकासाच्या मार्गावर यापुढेही आम्ही असेच चालत राहणार आहोत.

तोल मोल के बोल
ग जरातपेक्षा महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली आहे. महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. गुजरातच्या तुलनेत आपल्यावर कर्ज कमी आहे. विकासाच्या मार्गावर यापुढेही आम्ही असेच चालत राहणार आहोत.-अजित पवार, नेते, राष्ट्रवादी..................मुख्यमंत्र्यांनी निर्णय न घेण्याचा आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष्मीचे दर्शन घेण्याचा असे दोनच कार्यक्रम राबवले. आम्ही मात्र लोकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणार आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देण्याची वेळ आता आली आहे.नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री ...................यंदा सगळेच पक्ष मैदानात असल्याने अनेकांना संधी मिळाली आहे. काँग्रेस मात्र या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर मत मागणार आहे. आमचा विकासाचा अजेंडा हा पुढेही सुरु राहणार आहे. कोकणाचा विचार करता, गेल्या २५ वर्षांत कोकणाचा चेहरा मोहरा बदलला आहे. -नारायण राणे, प्रचारप्रमुख, काँग्रेस