तीन तोल मोल के बोल...........
By Admin | Updated: September 25, 2014 23:04 IST2014-09-25T23:04:05+5:302014-09-25T23:04:05+5:30
रिपाईं(ए)च्या उमेदवारांना १०० ठिकाणी अर्ज दाखल करण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. जागावाटपाचा निर्णय पसंत पडला तर काही ठिकाणी आम्ही माघार घेऊ शकतो. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. पुढील वाटाघाटीची आम्ही वाट पाहत आहोत.

तीन तोल मोल के बोल...........
र पाईं(ए)च्या उमेदवारांना १०० ठिकाणी अर्ज दाखल करण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. जागावाटपाचा निर्णय पसंत पडला तर काही ठिकाणी आम्ही माघार घेऊ शकतो. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. पुढील वाटाघाटीची आम्ही वाट पाहत आहोत. -खा. रामदास आठवले, राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)........................................मोदी सरकार लोकसभेत भावनेचे राजकारण करुन सत्तेत आले. मात्र, यंदा विधानसभेत तसे होणार नाही. आम्ही गेल्या १५ वर्षांत विकासाची अनेक कामे केेलेली आहेत. विकासाच्याच मुद्द्यावर सर्व धर्मांना सोबत घेऊन आमची वाटचाल यापुढेही सुरुच राहणार आहे. भाजपने दिलेली खोटी आश्वासने मतदारांच्या पूर्णपणे लक्षात आलेली आहेत. आता त्यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही.-आ. नसीम खान, काँग्रेस उमेदवार.....................................शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष केवळ हिंदुत्वाची भाषा करत असतात. त्यामुळे सत्तेसाठी या लोकांनी अनेकांना वेठीस धरले होते. मात्र, महायुती तुटल्यानंतर आता प्रत्येक पक्षाची शक्ती लोकांना पाहायला मिळणार आहे. राज्यातील जनता सुज्ञ असून ते योग्य निर्णय यावेळी घेतील. -आ. अबू आझमी, अध्यक्ष, महाराष्ट्र समाजवादी पार्टी