Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘भारतमाता’मध्ये आजपासून पुन्हा घुमणार टाळ्या अन् शिट्ट्यांचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 06:36 IST

भारतमाता सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी खुले होणार असल्याची माहिती सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठी सिनेमांचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या सहा वर्षांपासून बंद अवस्थेतील लालबागमधील भारतमाता सिनेमागृहाची दारे अखेर उघडणार आहेत. उद्या, मंगळवारी संध्याकाळी ५:३० वाजता भारतमाता सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी खुले होणार असल्याची माहिती सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

२०२०मध्ये नूतनीकरणासाठी बंद झालेले भारतमाता नंतर कोविडमुळे सुरू होऊ शकले नाही. नूतनीकरणाला झालेला विलंब, सिनेमागृह पुन्हा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या व लायसेन्स मिळवण्याच्या चक्रव्यूहात सिनेमागृह अडकत गेले. भारतमाता पुन्हा सुरू होणार असल्याचा आनंद परिसरातील प्रेक्षकांनाही आहे. सिनेमागृहाबाहेर पोस्टर झळकले असून, भारतमाता नावावर लाल रंगाचे कापड गुंडाळले आहे. सिनेमा सुरू होण्यापूर्वी हा पडदा काढून टाकला जाईल असे, सिनेमागृहाचे मॅनेजर सत्यवान पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

असे आहे नवे रुपडे 

सिनेमागृहाच्या बाह्यभागातील रंगरंगोटी, सजावट आणि साफसफाईचे काम पूर्ण झाले आहे. काही शिल्लक तुरळक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ४०९ आरामदायी आसने असलेले वातानुकूलित सिनेमागृह प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे. डॉल्बी साऊंड, लेझर प्रोजेक्टर, २के फॅारमॅटवर सिनेमा पाहायला मिळेल. ३५ बाय ६० साईजच्या मोठ्या पडद्यावर सिनेमा दिसणार आहे. मराठी चित्रपटांचे शो लवकरच सुरू होणार आहेत. जरी हे सिनेमागृह वन सिनेमाने चालविण्यासाठी घेतले असले तरी इथले सर्वाधिक प्रेक्षक मराठी असल्याने मराठीला प्राधान्य दिले जाईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : BharatMata Cinema Hall in Mumbai Reopens After Six Years

Web Summary : Mumbai's iconic BharatMata cinema, closed for renovations and COVID-related delays, reopens Tuesday. The renovated, air-conditioned hall features Dolby sound, a laser projector, and comfortable seating. Marathi films will be prioritized.
टॅग्स :नाटकमुंबई