महिला प्रवाशांसाठी लवकरच ‘तेजस्विनी’ बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 05:21 AM2019-11-07T05:21:07+5:302019-11-07T05:21:33+5:30

सध्या बेस्टच्या ताफ्यात आलेल्या तीन तेजस्विनी बसमध्ये ३५ आसनव्यवस्था असून

 Soon 'Tejaswini' bus service for female passengers | महिला प्रवाशांसाठी लवकरच ‘तेजस्विनी’ बससेवा

महिला प्रवाशांसाठी लवकरच ‘तेजस्विनी’ बससेवा

googlenewsNext

मुंबई : रेल्वे प्रशासनामार्फत चालविण्यात येणाऱ्या महिला विशेष लोकलप्रमाणे बेस्ट उपक्रमाची महिला विशेष बससेवा लवकरच सुरू होणार आहे. अशा एकूण ३७ ‘तेजस्विनी’ बसगाड्यांपैकी तीन बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. बेस्ट उपक्रमामार्फत सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) अशी महिला विशेष डबलडेकर बससेवा सुरू आहे. मात्र, गेल्या काही काळात महिला प्रवाशांची संख्याही वाढली आहे. दररोज बसगाडीतून प्रवास करणाºया ३३ लाख प्रवाशांमध्ये सात लाख महिला प्रवासी आहेत. या प्रवाशांना तेजस्विनीमुळे दिलासा मिळणार आहे.

सध्या बेस्टच्या ताफ्यात आलेल्या तीन तेजस्विनी बसमध्ये ३५ आसनव्यवस्था असून, विना वातानुकूलित आहेत. जयपूरमध्ये तयार करण्यात आलेल्या अशा एका बसची किंमत २९.५ लाख रुपये आहे. या तीन बसगाड्या सध्या धारावी बस आगारात उभ्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित ३४ बसगाड्या पुढील महिन्याभरात बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

केंद्र सरकारकडून ११ कोटींचे अनुदान
तेजस्विनी योजनेंतर्गत बेस्ट उपक्रमाला केंद्र सरकारकडून ११ कोटींचे अनुदान मिळणार आहे. नवी मुंबई महापालिकेमार्फत अशा दहा बसगाड्या मार्च, २०१८ पासून सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत ही बस धावणार आहे. मागणी वाढल्यास या बससेवेची संख्याही वाढविण्यात येणार आहे.

Web Title:  Soon 'Tejaswini' bus service for female passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई