Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनू निगमच्या वडिलांनी घेतला १२ कोटींचा फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 08:42 IST

एका आलिशान इमारतीत १० व्या मजल्यावर हा फ्लॅट असून, तो २००२ चौरस फुटांचा आहे.

मुंबई : बॉलीवूड कलाकारांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील वर्सोवा लिंक रोड परिसरात प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या वडिलांनी १२ कोटी रुपयांना एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. एका आलिशान इमारतीत १० व्या मजल्यावर हा फ्लॅट असून, तो २००२ चौरस फुटांचा आहे.

सोनू निगम यांचे वडील अगम कुमार निगम यांनी या फ्लॅटच्या खरेदीसाठी ७२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. २०२३ या वर्षात मुंबईच्या गृहविक्रीने दीड लाखांचा टप्पा ओलांडाला होता. यामध्ये बॉलीवूड कलाकार तसेच बॉलीवूडशी संबंधित मंडळींनी मुंबईच्या बांधकाम क्षेत्रात फ्लॅट आणि कार्यालयाच्या रूपाने एकूण ३७२ कोटी रुपयांची खरेदी केली आहे.

चालू वर्षात अभिनेता जॉन अब्राहम याने ७० कोटी रुपयांना खार येथे बंगला विकत घेतला होता. त्यानंतर बॉलीवूडमधील अनेकांनी चालू वर्षातही कोट्यवधींची खरेदी केली आहे.

टॅग्स :मुंबई