Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनू निगमचे गँगस्टरशी होते संबंध!, दिव्या खोसलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 05:06 IST

भूषण कुमार यांच्यातील वादाने आता वेगळेच वळण घेतले असून सोनूचे कुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्याशी संबंध होते, असा गंभीर आरोप भूषण कुमारांची पत्नी दिव्या खोसला यांनी केला आहे.

मुंबई : गायक सोनू निगम आणि चित्रपट निर्माता भूषण कुमार यांच्यातील वादाने आता वेगळेच वळण घेतले असून सोनूचे कुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्याशी संबंध होते, असा गंभीर आरोप भूषण कुमारांची पत्नी दिव्या खोसला यांनी केला आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोनू निगमने व्हिडिओ शेअर करून अभिनय क्षेत्रात घराणेशाही आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर पोस्ट केलेल्या व्हिडीओत गायक अरमान मलिक, अमाल मलिक, निर्माते भूषण कुमार यांच्यावर टीका केली होती. त्यावरून दिव्याने निगमला सुनावले.भूषण कुमार यांनी सालेमपासून वाचण्यासाठी माझी मदत मागितली होती, असा आरोप सोनू निगमने केला होता. त्यावर दिव्या खोसला म्हणाल्या, भूषण कुमारने तुमच्याकडे मदत मागितली, कारण तुमचे आणि अबू सालेमचे संबंध होते.‘भूषण कुमार, अबू सालेमपासून मला वाचव. अशी विनवणी तू माझ्याकडे केली होती. विसरलास का ते दिवस?’ असे सोनू निगमने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :सोनू निगम