ंसराईत सोनसाखळी चोर गजाआड
By Admin | Updated: July 12, 2015 21:58 IST2015-07-12T21:58:02+5:302015-07-12T21:58:02+5:30

ंसराईत सोनसाखळी चोर गजाआड
>सराईत सोनसाखळी चोर गजाआडजेजेमध्ये वृद्धेची चोरली होती सोनसाखळी मुंबई: जे.जे. हॉस्पिटल परिसरातून एका वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पलायन करणार्या एका सराईत सोनसाखळी चोरट्याला जे.जे.मार्ग पोलिसांनी शिताफीने अटक केली. लिटॉन अबूकासम शेख (वय३४, रा. एकतानगर झोपडपी, बीपीटी कॉलनीसमोर, वाडीबंदर) असे त्याचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले. जे.जे. रुग्णालयातील कर्मचार्यांच्या क्वार्टरर्समध्ये रहात असलेल्या मनिबेन महिडा ही ७० वर्षांची महिला नूर मशिदीच्या दिशेने जात असताना चोरट्याने त्यांना अडवून गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला. तेथील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये त्याचे पुसटसे फुटेज मिळाले होते. सहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने त्याआधारे पूर्ण परिसर धुंडाळून काढला. संबंधित वर्णनाचा इसम उपनिरीक्षक मोरे, हवालदार खैरे यांनी वाडीबंदराजवळील झोपडपीतून ताब्यात घेतला. तपासणीत तो गर्दुल्ला असल्याचे तसेच त्याने घरफोडीसह अनेक गुन्हे केल्याचे उघडकीस आले. (प्रतिनिधी)