सोनम कपूरला डिस्चार्ज

By Admin | Updated: March 8, 2015 00:21 IST2015-03-08T00:21:29+5:302015-03-08T00:21:29+5:30

स्वाइन फ्लूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या सोनम कपूरला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला़ ती मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल होती.

Sonam Kapoor discharges | सोनम कपूरला डिस्चार्ज

सोनम कपूरला डिस्चार्ज

मुंबई : स्वाइन फ्लूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या सोनम कपूरला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला़ ती मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल होती.
गुजरातच्या राजकोट येथे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या सोनमला अचानक ताप आल्याने तसेच घसा दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते. या वेळी केलेल्या विविध चाचण्यांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर तिला एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईत आणण्यात आले व कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तिची प्रकृती सुधारत असल्याचे तिचे वडील तथा प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी सांगितले होते. तिला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, असे संकेतही त्यांनी दिले होते़ मात्र, होळी असल्याने सोनमला एक दिवस उशिरा सोडण्यात आल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. सोनमची प्रकृती सुधारत असली तरी आणखी एक आठवडा तिला विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Sonam Kapoor discharges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.