सोनाक्षी सिन्हावर गुन्हा दाखल का नाही ? - महेश भटचा सवाल
By Admin | Updated: February 13, 2015 17:59 IST2015-02-13T17:59:44+5:302015-02-13T17:59:44+5:30
एआयबी नॉकआऊट शोप्रकरणी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यावर गुन्हा दाखल का करण्यात आला नाही असा सवाल आलियाचे वडिल व चित्रपट निर्माते महेश भट यांनी उपस्थित केला आहे.

सोनाक्षी सिन्हावर गुन्हा दाखल का नाही ? - महेश भटचा सवाल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - एआयबी नॉकआऊट शोप्रकरणी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यावर गुन्हा दाखल का करण्यात आला नाही असा सवाल आलियाचे वडिल व चित्रपट निर्माते महेश भट यांनी उपस्थित केला आहे.
अश्लिल भाषाचा वापर केल्याच्या आरोपावरून महेश भट यांची मुलगी आलिया भट, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यासह १४ जणांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोनाक्षी सिन्हा ही भाजपा खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असल्यानेच पोलिसांनी सोनाक्षी हिच्याविरुध्द गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप महेश भट यांनी ट्टिटरवर केला आहे. महेश भट यांनी केलेल्या आरोपाला सोनाक्षी सिन्हाने प्रत्यूत्तर दिले आहे.