Join us
Daily Top 2Weekly Top 5

टिपू सुलतान भारतमातेचे सुपुत्र; त्यांची बदनामी सहन करणार नाही- डॉ. राजन माकणीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 16:10 IST

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) हजरत टिपू सुलतान यांच्या नावाला सदैव समर्थन देईल आणि विरोध करणाऱ्या जात्यंध शक्तीचा कायम निषेध करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबई - टिपू सुलतान हे भारतमातेचे सुपुत्र असून ते देशभक्त होते. ते हिंदूविरोधी मुळीच नव्हते. त्यामुळे त्यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नव्या नायकांच्या प्रतिमांची निर्मिती करण्यासाठी हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. खऱ्या राष्ट्रीय नायकांना खाली खेचण्याचा हा प्रयत्न आहे, असेही ते पुढे म्हणाले. टिपू सुलतान यांनी सर्व धर्मांसाठी कार्य केले असून त्यांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे लोक मोठमोठ्या पदांवर होती. ते हिंदूविरोधी मुळीच नव्हते. तर, मंदिरांच्या निर्मितीस त्यांचा मोलाचा हातभार आहे. त्यांनी इंग्रजी राजवटीला सळो की पळो करून सोडले होते.

१७ व्या शतकातील देशभक्त टिपू सुलतान यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांनी इतिहासाची पाने चाळावीत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) हजरत टिपू सुलतान यांच्या नावाला सदैव समर्थन देईल आणि विरोध करणाऱ्या जात्यंध शक्तीचा कायम निषेध करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका