मुंबई - मिरवणुकीसाठी घराबाहेर पडलेल्या ११ वर्षांच्या मुलाचा सोमवारी मृतदेह सापडल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली. अंगावर खरचटल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.मानखुर्दच्या मंडाला झोपडपट्टी परिसरात हा मुलगा कुटुंबीयांसोबत राहतो. रविवारी मिरवणुकीला जातो, म्हणून तो घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने, कुटुंबीयांनी सोमवारी सकाळी पोलीस ठाणे गाठले. त्याचा शोध सुरू असतानाच, एका झोपडीशेजारी त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. शवविच्छेदनाच्या अहवालातूनच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
‘त्या’ मुलाचा सापडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 05:43 IST