मुंबई : देशातील नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी असलेल्या न्यू इंडिया अश्योरन्स कंपनी लिमिटेडमध्ये भरती प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. दुसऱ्या व्यक्तीकडून परीक्षा व मुलाखत देऊन प्रशासकीय अधिकारी पद मिळवणाऱ्या एका कर्मचाऱ्याने जवळपास दोन वर्षे त्या पदावर काम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या दोन वर्षांत कंपनीची तब्बल २० लाख रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीचे प्रशासकीय अधिकारी जनार्धन होनावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मूळचा बिहारचा रहिवासी असलेला चंदन कुमार याची १ एप्रिल २०२४ रोजी प्रशासकीय अधिकारी पदावर नियुक्ती झाली होती.
ही भरती प्रक्रिया
आयबीपीएसमार्फत देशभर राबविण्यात आली होती, ज्यामध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे होते. मात्र, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी कंपनीच्या मुख्यालयाला आलेल्या एका ई-मेलमधून या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याची माहिती समोर आली. त्यात चंदन कुमारसह आणखी काही उमेदवारांनी स्वतःऐवजी दुसऱ्या व्यक्तीकडून परीक्षा व
मुलाखत दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीची गंभीर दखल घेत कंपनीने दिल्ली आणि नोएडा येथील खासगी तपास यंत्रणांकडून चौकशी करून घेतली.
२ जानेवारी रोजी सादर झालेल्या अहवालात चंदन कुमार दोषी आढळल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणामुळे कंपनीत खळबळ उडाली.
दोन जणांवर गुन्हा दाखल
चंदन कुमार हा मार्च २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत कार्यरत होता आणि या काळात त्याने सुमारे २० लाख १६ हजार रुपयांचे वेतन घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी व त्याच्या जागी परीक्षा देणाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू आहे. अशाप्रकारे अन्य कुणी नोकरी मिळवली का? त्याचाही तपास सुरू आहे.
‘त्या’ ई-मेलमध्ये काय?
नवनियुक्त ४५० प्रशासकिस अधिकाऱ्यांपैकी चंदन कुमार, भोपाळ येथील विभागीय कार्यालयात सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले अजित कुमार व दिल्ली येथील विभागीय कार्यालयात सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले युवराज कुमार यांनी धोखाधड़ी करून गैरमार्गाने पद मिळविले असून, भरती प्रक्रियेमध्ये त्यांचेऐवजी इतर कोणीतरी परिक्षा व मुलाखात दिली असल्याचे नमुद कले आहे. नमुद ई-मेलची दखल मुख्यालय कार्यालयाने गांभीर्याने घेतली व हा मेल विभागीय कार्यालयात पाठवून दिले. त्यानंतर सविस्तर चौकशीकरीता मुख्यालयाने तपासी यंत्रणाची नियुक्ती करत तपास सुरु केला. त्यात, चंदन दोषी आढळला.
बायोमेट्रिक तपासणीत गैरप्रकार उघड
विभागीय कार्यालयाने त्याला बायोमेट्रिक तपासणीसाठी बोलावले असता, त्याचे थंब इम्प्रेशन भरती प्रक्रियेतील नोंदींशी जुळत नसल्याचे निष्पन्न झाले. त्याला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. मात्र, समाधानकारक उत्तर न दिल्याने ६ जानेवारी रोजी त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
Web Summary : An employee fraudulently obtained a job at New India Assurance by having someone else take the exam. He worked for two years, earning ₹2 million. A police case has been filed, and investigations are ongoing to find other potential fraud cases.
Web Summary : न्यू इंडिया एश्योरेंस में एक कर्मचारी ने धोखाधड़ी से नौकरी हासिल की। किसी और ने परीक्षा दी, और उसने दो साल काम करके ₹20 लाख कमाए। पुलिस मामला दर्ज, अन्य धोखाधड़ी की जांच जारी है।