Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणी दत्तक घेता का दत्तक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 01:02 IST

शहरातल्या नागरिकांना ममत्व वाटावे, त्यांच्यात जवळीक निर्माण व्हावी म्हणून २०१३ मध्ये राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी ‘दत्तक योजना’ सुरू करण्यात आली.

- सागर नेवरेकर मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाविषयी शहरातल्या नागरिकांना ममत्व वाटावे, त्यांच्यात जवळीक निर्माण व्हावी म्हणून २०१३ मध्ये राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी ‘दत्तक योजना’ सुरू करण्यात आली. मात्र गेल्या काही वर्षांत या योजनेकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे उद्यानातील ८०हून अधिक वन्यप्राणी या घडीला दत्तक घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत.२०१८-१९ या वर्षात जीत रामदास आठवले यांनी बिबट्या (भीम), अभिनेता सुमित राघवन यांनी बिबट्या (तारा), साधना वझे यांनी बिबट्या (अर्जुन), गीता प्रभाकर उल्मन यांनी नीलगाय, रेमंड यांनी तीन सिंह, एक पांढरा वाघ आणि चार वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट), चार चितळ आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सदिच्छादूत अभिनेत्री रवीना टंडन यांनी एक बिबट्या व एक नीलगाय हे वन्यप्राणी दत्तक घेतले आहेत. इतर वन्यप्राणी दत्तक घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र व सिंह विहार विभागाचे वनअधिकारी संजय वाघमोडे यांनी सांगितले की, आता दत्तकयोजनेला कमी प्रतिसाद आहे. २०१८-१९ या वर्षात या योजनेंतर्गत एकूण ६ व्यक्तींनी प्राणी दत्तक घेतलेआहेत.भविष्यात अधिकाधिक व्यक्ती, संस्था व संघटनांनी वन्य प्राण्यांना दत्तक घेण्यात पुढाकार घेतला पाहिजे. योजना वाढली, तर लोकांचे वन्य प्राण्याविषयी प्रेम, आस्था वाढेल आणि जवळीक निर्माण होईल. तसेच वन्यजीवांची अधिक माहिती आणि ज्ञान देण्यास मदत होईल.>प्राणी दत्तककसा घ्याल?आपल्या आवडीचा वन्यजीव दत्तक घ्यायचा असल्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक यांच्याकडे अर्ज करावा. एखादा प्राणी एका वर्षासाठी दत्तक घेता येईल. निवडलेल्या प्राण्याचे दत्तक शुल्क हे विनापरतावा असून, डिमांड ड्राफ्टद्वारे शुल्क भरावे लागेल. दत्तक घेतलेल्या प्राण्याचा आहार, औषधे व इतर बाबी सरकारी नियमानुसार होईल.>काय आहे ही योजनाया योजनेंतर्गत प्राणिप्रेमींना वन्यजीवांना वर्षभर दत्तक घेता येते. म्हणजेच त्या प्राण्याच्या देखभालीचा खर्च घेतला जातो..काय आहे दत्तक योजनेचा दरसिंह ३ लाख रुपये,पांढरा वाघ३ लाख २० रुपयेवाघ ३ लाख१० हजार रुपयेबिबट्या १ लाख२० हजार रुपयेवाघाटी५० हजार रुपयेचितळ२० हजार रुपयेनीलगाय३० हजार रुपयेभेकर १० हजार रुपये

टॅग्स :वाघ