Join us  

वर्सोव्याच्या समस्या सोडवा, वर्सोव्याच्या रहिवाश्यांची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: May 09, 2024 2:12 PM

गेल्या अनेक वर्षापासून केंद्राच्या माध्यमातून आमचे जे प्रलंबित प्रश्न प्रश्न सोडवले जाण्याची आवश्यकता होती ते अद्याप सुटलेले नाहीत.

मुंबई-गेल्या अनेक वर्षापासून केंद्राच्या माध्यमातून आमचे जे प्रलंबित प्रश्न प्रश्न सोडवले जाण्याची आवश्यकता होती ते अद्याप सुटलेले नाहीत. ज्याप्रमाणे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचा सुनियोजित विकास करून आपण समस्या सोडवल्या, त्याचप्रमाणे २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील वर्सोवा बरोबरच अन्य भागातील समस्या सोडवण्यासाठी लोकसभेत आवाज उठवावा अशी मागणी वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांनी २७,मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्याकडे केली.

वायकर यांच्या प्रचारार्थ वर्सोवा कोळीवाडा येथून प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कोळी समाजाच्या देवीचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचार फेरीला सुरुवात केली. या प्रचार फेरीत वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या भाजप आमदार डॉ.भारती लव्हेकर,माजी खासदार संजय निरुपम, मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, रासपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार फेरीत सहभागी झाले होते. या प्रचारफेरी दरम्यान ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले.

टॅग्स :मुंबईशिवसेनाभाजपालोकसभा निवडणूक २०२४