सोनसाखळ्या चोरणार्‍या सख्ख्या भावांना अटक

By Admin | Updated: May 7, 2014 01:21 IST2014-05-06T18:24:07+5:302014-05-07T01:21:55+5:30

सोनसाखळ्या चोरणार्‍या सख्ख्या भावांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Soldiers arrested for stealing sticks | सोनसाखळ्या चोरणार्‍या सख्ख्या भावांना अटक

सोनसाखळ्या चोरणार्‍या सख्ख्या भावांना अटक

ठाणे - सोनसाखळ्या चोरणार्‍या सख्ख्या भावांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ठाण्यातील पाच सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यातील साडेआठ तोळ्यांचे दागिने हस्तगत केले आहेत. हे दोघे सराईत चोरटे असून ते इराणी टोळीतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुस्तफा जाफरी आणि मुस्लिम जाफरी अशी अटक भावांची नावे असून ते मुंब्य्रातील रशीद कम्पाउंडमध्ये राहणारे आहेत़ त्या दोघांना ७ एप्रिल रोजी नवी मुंबईतील नेरूळ पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर, नेरूळ पोलिसांकडून ठाणे गुन्हे शाखेने त्यांचा ताबा घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामधील कळवा पोलीस ठाण्यातील तीन तर नौपाडा आणि मुंब्य्रातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच सुमारे दोन लाखांचे साडेआठ तोळ्यांचे दागिनेही हस्तगत केले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांविरोधात ठाणे, मुंबई आणि पुणे येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांनी दिली.
(प्रतिनिधी)

Web Title: Soldiers arrested for stealing sticks