सॉफ्टवेअर इंजीनिअर तरूणीची आत्महत्या
By Admin | Updated: March 15, 2015 01:08 IST2015-03-15T01:08:31+5:302015-03-15T01:08:31+5:30
सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या २२वर्षीय तरूणीने राहत्या इमारतीच्या १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

सॉफ्टवेअर इंजीनिअर तरूणीची आत्महत्या
मुंबई : सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या २२वर्षीय तरूणीने राहत्या इमारतीच्या १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना काल रात्री विक्रोळी-जोगेश्वरी जोडरस्त्यावरील आरएनए टॉवरमध्ये घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
आरएनए हाईटसमध्ये कार्थिका देवान पालकांसोबत राहात होती. गोरेगावच्या टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस कंपनीत काम करणाऱ्या कार्तिकाने एमबीएच्या अभ्यासासाठी ब्रेक घेतला होता. शुक्रवारी रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास तिने १४व्या मजल्यावरील राहत्या घराच्या खिडकीतून उडी मारली आणि स्वत:चे आयुष्य संपवले. कार्थिकाच्या खोलीतून पोलिसांना तिची एक डायरी सापडली. ती फार तणावात असल्याचे त्या डायरीत लिहिले होते. मात्र आत्महत्येचे नेमेके कारण तिने लिहिलेले नाही. तिच्या मृत्यूसाठी इतर काही घटक जबाबदार आहेत का, याचा तपास पोलीस घेत आहेत.