Join us  

CoronaVirus News: ...तर कोरोनाचा संभाव्य धोका टाळता येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 1:01 AM

संसर्गाचे निदान करण्यासाठी सहा मिनिटे वॉक टेस्ट घेण्याचे आवाहन

मुंबई : शरीरामध्ये पुरेशा ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता हे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमधले प्रमुख लक्षण आहे. तसेच ही कमतरता असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. सहा मिनिटांची वॉक टेस्ट केल्यास हा संभाव्य धोका वेळीच ओळखणे शक्य आहे.

या टेस्टमुळे कमी होत असलेली ऑक्सिजन पातळी समजण्यास मदत होते. तसेच, संसर्ग होण्याची भीती वाटणाऱ्या घरीच असलेल्या व्यक्तींसाठी, विशेषत: वृद्धांसाठी ही चाचणी मोठे वरदान ठरत असल्याची माहिती कोविड - १९ नियंत्रणासाठी सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य आणि मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील इंटेन्सिव्ह केअरचे संचालक डॉ. राहुल पंडित यांनी दिली.

ही चाचणी आता हायपोक्सिया (९४ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन पातळी) नसलेल्या कोविड-१९ रुग्णांसाठी किंवा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या, तसेच हृदयविषयक आजारासारख्या कोमॉर्बिडीटीज असलेल्या रुग्णांसाठी स्क्रीनिंग टूल म्हणून वापरण्यात येते.

व्यक्ती लक्षणे दिसून येण्याच्या ५ ते १२ दिवसांमध्ये ही चाचणी करू शकतात. ही चाचणी स्वत:हून करता येते. घरामध्ये सहा मिनिटे आरामशीरपणे पायी चालत ही चाचणी करणे शक्य आहे. कुटुंबातील एखादा सदस्य फिंगर पल्स आॅक्सिमीटरचा उपयोग करीत ही चाचणी घेऊ शकतो. यासाठी डॉक्टर, परिचारिका किंवा पॅरामेडिकल उपस्थित असण्याची गरज नाही. व्यक्ती कोणाच्याही आधाराशिवाय चालू शकत असेल आणि ९४ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन पातळी राखण्यासाठी आॅक्सिजनची गरज भासत नसेल तर व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची गरज नसल्याचे पंडित यांनी सांगितले.

चाचणी घेण्याची पद्धत-

च्रुग्णाने तोंडावर साधा कपडा किंवा सर्जिकल मास्क परिधान करावा. च्चाचणीपूर्वी बेसलाइन ऑक्सिजन पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक असावी, व्यक्तीला आराम करत असताना श्वास घेण्यामध्ये त्रास नसावा आणि कोणाचाही आधार न घेता चालता आले पाहिजे.च् चाचणी घेताना व्यक्तीला डोकेदुखी किंवा श्वास घेण्यामध्ये त्रास होत असेल तर याची नोंद करून ठेवावी. याला ‘अनमास्किंग हायपोक्सिया’ म्हणतात. यामध्ये रुग्ण कदाचित हायपोक्सिक (शरीरामध्ये पुरेशा आॅक्सिजन पुरवठ्याची कमतरता) असू शकतो आणि म्हणूनच हॉस्पिटलमध्ये भरती करत किंवा उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आॅक्सिजन सपोर्ट असलेल्या आयसीयूमध्ये रुग्णाला शिफ्ट करत लवकर निदान करता येऊ शकते. रक्तातील आॅक्सिजन पातळी ९४ टक्के ते १०० टक्के दरम्यान असली पाहिजे. या पातळीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा घट इमर्जन्सी समजावी आणि रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करावे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई