Join us  

...तर विरोधक म्हणतील, ‘ये दिवार टुटती क्यूं नहीं..!’ - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 5:52 AM

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी अभेद्य आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल.

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी अभेद्य आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल. विरोधकांनी कितीही वावड्या उठवल्या तरी त्याने काहीच फरक पडणार नाही. ह्यये दिवार टूटती क्यंू नही... ए आघाडी की दिवार टूटेगी कैसे? अंबुजा...एसीसी... बिर्ला सिंमेटसे जो बनी है,’ असे म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकेबाजी केली.सायन येथील सोमय्या मैदानात रविवारी मुंबई विभागीय काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा झाला. मेळाव्याचे उद्घाटन करताना अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, पक्षाला सोडून गेलेले परत आले तरी त्यांना किमान सहा महिने वेटिंगवर ठेवा. विशेषत: मुंबईत सचिन अहिर, संजय पाटील, चित्रा वाघ, प्रसाद लाड, सुभाष मयेकर असे पक्ष सोडून गेले आहेत. मात्र आता असे कार्यकर्ते शोधा जे सत्ता नसताना आपल्याकडे राहतील. सत्ता आली म्हणून आता हौसे नवशे गवशे येतील. मात्र त्यांना लगेच पदे देवू नका. जे कोण चिकटायला आले आहेत. त्यांना दोन वर्ष काही देवू नका. त्याला काम करू द्या मगच त्यांचा विचार करू.महाविकास आघाडी सरकारने दोन महिन्यात शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा कायदा झाला. शिवभोजन थाळी योजना सुरू केली. मागच्या सरकारचे काही चुकीचे निर्णय बदलले. आमच्या सरकारने कुठलीही विकास कामे थांबवली नाहीत. ज्या कामांच्या बाबतीत शंका आहे, जी कामे जनतेच्या भल्याची नाहीत तीच थांबवली आहेत, असेही ते म्हणाले. अल्पसंख्याक मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधी व न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :अजित पवार