Join us  

...म्हणून पुन्हा एकदा मराठा समाजाचा सरकारविरोधात मंत्रालयावर धडक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 6:41 PM

या मराठा धडक मोर्चाचा मार्ग सीएसएमटी पासून मंत्र्यालयापर्यत असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे: मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सरकारने तोडगा न काढल्यामुळे सोमवारी 26 ऑगस्टला  सकाळी 11 वाजता मराठा समाज पुन्हा एकदा धडक मोर्चा काढणार असल्याची माहीती पत्रकार परिषदेत दिली. 

या मराठा धडक मोर्चाचा मार्ग सीएसएमटी पासून मंत्र्यालयापर्यत असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे मोर्चा अडविल्यास ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या दोन दिवसात सरकारने निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे. 

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या:

- आंदोलन काळातील सरसकट सर्व गुन्हे मागे घ्यावे- 2014 च्या विद्यार्त्याना तत्काळ नियुक्त्या द्या.-72 हजार मेगा भरतीतील विद्यार्त्याना तत्काळ नियुक्त्या द्या.- एमपीएससीच्या विद्यार्त्यांना तत्काळ नियुक्त्या द्या..- सारथी प्रशिक्षण स्वस्था मराठ्यांसाठी समिती द्या.- आ पाटील महामंडलानच्या सुलभ कर्ज योजना तत्काळ करा.- शेतकऱ्यांना पीकविमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा.

टॅग्स :मराठा क्रांती मोर्चामराठा