Join us  

... म्हणून ताफ्यातील वाहनचालकाला मंत्री यशोमती ठाकूर यांचा 'कडक सॅल्यूट'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 10:12 PM

मारुतीराव किन्हाके 1989 साली पोलीस दलात रुजू झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या निमित्तानं ते सारथ्य करीत असतात.

ठळक मुद्देमंत्रीमहोदयांनी केलेल्या सॅल्यूटमुळे मारुती किन्हाळे भारावले होते. कारण, दररोज त्यांच्याहातून इतर अधिकारी, मंत्री किंवा तत्सम पोलिसांना सॅल्यूट मारण्यात येत होता. मात्र, सेवेतील शेवटच्या दिवशी चक्क मंत्रीमहोदयांनीच सॅल्यूट करत त्यांना निरोप दिला. 

मुंबई - पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी पाहत असतो. मात्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज आपल्या ताफ्यातील वाहन चालक मारुती किंन्हाके यांना सॅल्युट करत त्यांच्या अविरत प्रामाणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महिला व बालविकासमंत्र्याच्या या कृत्याचे पोलीस दलाकडून कौतुक होत आहे. 

मारुतीराव किन्हाके 1989 साली पोलीस दलात रुजू झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या निमित्तानं ते सारथ्य करीत असतात. मारुतीराव यांची 31 जुलै रोजी सेवानिवृत्ती होती. कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी त्यांचं औक्षण करून तसेच त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव श्रीमती ठाकूर यांनी केला. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुतीराव यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना ठाकूर यांनी सॅल्यूटही केला. तसेच त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

मंत्रीमहोदयांनी केलेल्या सॅल्यूटमुळे मारुती किन्हाळे भारावले होते. कारण, दररोज त्यांच्याहातून इतर अधिकारी, मंत्री किंवा तत्सम पोलिसांना सॅल्यूट मारण्यात येत होता. मात्र, सेवेतील शेवटच्या दिवशी चक्क मंत्रीमहोदयांनीच सॅल्यूट करत त्यांना निरोप दिला. 

टॅग्स :यशोमती ठाकूरपोलिसमुंबई