Join us  

... तर मी स्वत: जाऊन भाजपा नेत्यांना पुष्पगुच्छ देईन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 3:46 PM

एखाद्या मतदारसंघात 1 लाख मतदान झालं असेल तर तिथे 1 लाख 20 हजार मतदान, मोजणीच्या वेळेस समोर येऊच कसं शकतं,

ठळक मुद्देएखाद्या मतदारसंघात 1 लाख मतदान झालं असेल तर तिथे 1 लाख 20 हजार मतदान, मोजणीच्या वेळेस समोर येऊच कसं शकतं,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी देखील मतपत्रिकांवरच मतदान व्हायला हवं अशी घोषणा केली,

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात 28 पैकी 25 जागांवर भाजपचे खासदार निवडून आले. तर पुढील चारच दिवसात त्याच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कशी निवडून आली? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या मतपत्रिकांवर घेतल्या गेल्या असेही त्यांनी सांगितले. 

मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला, यावेळी राज ठाकरे बोलत होते. एखाद्या मतदारसंघात 1 लाख मतदान झालं असेल तर तिथे 1 लाख 20 हजार मतदान, मोजणीच्या वेळेस समोर येऊच कसं शकतं, बरं निवडणूक आयोगात जाऊनदेखील न्याय मिळत नाही, ना न्यायालयांमध्ये असा आरोपही राज यांनी केला. ईव्हीएमच्या माध्यमातून बहुमत आणलं जातंय. यांना जे मनाला वाटल ते रेटलं जातंय. या देशात लोकशाही जिवंत राहिली नाही. देशातील लोकशाही संपली आहे, असे राज यांनी म्हटले. 

विशेष म्हणजे, बॅलेट पेपरवरती मतदान झालं आणि त्यानंतरही येथील लोकांनी भाजपाला निवडून दिलं. तर, मी स्वत: जाऊन पुष्पगुच्छ देईन, असेही राज म्हणाले. कारण, तो लोकांचा जनाधार ठरेल, मशिनचा नाही, अशी पुष्टीही राज यांनी पुढे जोडली. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळेस 350 जागा येतील अशा घोषणा भाजपचे नेते करत होते, तसंच झालं. आत्ताही विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 220, 230 असे आकडे घोषित करत आहेत, आणि हा आकडा खरा वाटावा म्हणून भावनिक विषय पुढे करायचा आणि मग ईव्हीएमच्या जोरावर निवडणुका जिंकायच्या. एक दोन अपवादात्मक माध्यमं सोडली तर कोणीच सत्य मांडू शकत नाही आणि ह्या माध्यमांवर पण वरून दडपण आणलं जात आहे. हे सगळं बहुमताच्या जोरावर केलं जातंय असं राज ठाकरेंनी म्हटलं. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी देखील मतपत्रिकांवरच मतदान व्हायला हवं अशी घोषणा केली, बरं ह्याच अमेरिकेत ह्या ईव्हीएमची चिप बनते पण ह्या देशांचा ईव्हीएमवर विश्वास नाही मग आपण का हट्ट धरतोय? निवडणूका मतपत्रिकांवर घ्याव्यात ही आमची मागणी आहे आणि ती गैर नाही 371 मतदारसंघांमध्ये भाजपने ईव्हीएमच्या जोरावर फेरफार केले. पण ह्यावरही कोणी बोलायला तयार नाही अशी खंत राज यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :मुंबईभाजपाएव्हीएम मशीनराज ठाकरे