...म्हणून माजी पोलीस महासंचालकांनीही दिला राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:11+5:302020-11-28T04:06:11+5:30

टॉप्स ग्रुप आर्थिक ग़ैरव्यवहार प्रकरण \S....म्हणून माजी पोलीस महासंचालकांनीही दिला राजीनामा टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क ...

... so the former Director General of Police also resigned | ...म्हणून माजी पोलीस महासंचालकांनीही दिला राजीनामा

...म्हणून माजी पोलीस महासंचालकांनीही दिला राजीनामा

टॉप्स ग्रुप आर्थिक ग़ैरव्यवहार प्रकरण

\S....म्हणून माजी पोलीस महासंचालकांनीही दिला राजीनामा

टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांनी कंपनी कर्जबाजारी होत असताना, शेअर्स होल्डरचा विश्वास संपादन करण्यासाठी माजी पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्यासह चार दिग्गज मंडळीवर संचालक पदाची जबाबदारी साेपविली हाेती. मात्र सरकारी थकबाकीचे पत्र त्यांच्याकडे येताच त्यांनी तत्काळ राजीनामे दिल्याचे दाखल गुन्ह्यांत नमूद करण्यात आले आहे.

टॉप्स ग्रुपचे रमेश अय्यर यांनी कलेल्या तक्रारीनुसार, परदेशातील गुंतवणुकीबरोबर नंदा यांनी जुलैमध्ये संकेतस्थळावरून स्वतःसह कुटुंबीयांची नावे हटविली. अय्यर, अमर पनघल यांच्यासह अन्य संचालकांची नावे त्यावर टाकली. यात माथुर यांच्यासह आयएएस दिनेशकुमार गोयल यांच्यासारख्या दिग्गज मंडळीची नेमणूक केली. मात्र थकबाकीचे पत्र आल्यानंतर त्यांनी राजीनामे दिले.

कंपनीच्या गैरव्यवहाराबाबत नंदा यांच्याकडे विचारणा करताच त्यांनी २५ एप्रिल रोजी अधिकृत ईमेल ब्लॉक केले. तसेच त्यांचे ईमेल हॅक करून त्याद्वारे मेल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. राजकीय संबंधामुळे ते कारवाईपासून वाचत असल्याचा आरोपही अय्यर यांनी केला आहे.

....

Web Title: ... so the former Director General of Police also resigned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.