So far more than 1 crore 21 lakh beneficiaries have been vaccinated in the state | राज्यात आतापर्यंत १ कोटी २१ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

राज्यात आतापर्यंत १ कोटी २१ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

मुंबई – राज्यात शनिवारी २ लाख ३६ हजार २१० लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण १ कोटी २१ लाख ३९ हजार ७७१ लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत शनिवारी ५० हजार ७२५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजतागायत एकूण १९ लाख ४१ हजार ८७८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईत संचारबंदी असताना ५० हजारांहून अधिक नागरिकांनी लस घेतली. मुंबईखेरीज पुण्यात १७ लाख २७ हजार ११०, ठाण्यात ९ लाख ६ हजार ७९, नागपूरमध्ये ७ लाख ९९ हजार १, नाशिकमध्ये ५ लाख ४३ हजार ३३८, कोल्हापूरमध्ये ७ लाख २० हजार ५०१, अहमदनगरमध्ये ३ लाख ५१ हजार ९७९ , औरंगाबादमध्ये ३ लाख ३६ हजार ८५३ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: So far more than 1 crore 21 lakh beneficiaries have been vaccinated in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.