राज्यात आतापर्यंत १ कोटी ७ लाख ६१ हजार ७३६ जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:06 AM2021-04-15T04:06:40+5:302021-04-15T04:06:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मंगळवारी २ लाख १८ हजार ८२७ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले, तर राज्यात ...

So far 1 crore 7 lakh 61 thousand 736 people have been vaccinated in the state | राज्यात आतापर्यंत १ कोटी ७ लाख ६१ हजार ७३६ जणांचे लसीकरण

राज्यात आतापर्यंत १ कोटी ७ लाख ६१ हजार ७३६ जणांचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मंगळवारी २ लाख १८ हजार ८२७ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले, तर राज्यात आतापर्यंत एकूण १ कोटी ७ लाख ६१ हजार ७३६ जणांना लस देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

राज्यात मुंबईत सर्वाधिक लसीकरण करण्यात आले असून, १७ लाख ७३ हजार ४०९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्याखालोखाल पुण्यात १५ लाख २ हजार ४३७, नाशिक ४ लाख ७५ हजार २१५, नागपूरमध्ये ७ लाख ३५ हजार ४२०, ठाण्यात ७ लाख ७६ हजार ५७३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. मुंबईत आतापर्यंत २ लाख ६१ हजार ९१ आरोग्य कर्मचाऱ्यांना, २ लाख ८६ हजार ४४० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, तर ४५ ते ५९ वयोगटातील ५ लाख ४७ हजार १७ लाभार्थ्यांना, तर ६० वयाहून अधिक असलेल्या ७ लाख २ हजार १३८ जणांचे लसीकरण करण्यात आले.

Web Title: So far 1 crore 7 lakh 61 thousand 736 people have been vaccinated in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.