Join us  

... म्हणून हे कोविड सेंटर 2 महिन्यांपासून बंद, एवढं लज्जास्पद राजकारण नको 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 4:36 PM

देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. तर, दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना कालावधीत कोविड सेंटर, वैद्यकीय कॉलेज आणि रुग्णालयांच्या व्यवस्थेकडे प्राधान्याने लक्ष दिले.

ठळक मुद्दे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना कालावधीत कोविड सेंटर, वैद्यकीय कॉलेज आणि रुग्णालयांच्या व्यवस्थेकडे प्राधान्याने लक्ष दिले.

नवी दिल्ली - : देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारत व अमेरिका यांच्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये २० लाखांचा फरक आहे. कोरोना साथीचा झपाट्याने होणारा फैलाव पाहता सर्वाधिक रुग्णसंख्येबाबत भारत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेला मागे टाकण्याची शक्यता आहे, असे बीट्स पिलानी या शिक्षणसंस्थेमधील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासाच्या निष्कर्षात म्हटले आहे. राजधानी दिल्लीत सद्यस्थितीत दिवसाला 4-4 हजार रुग्ण आढळून येत आहेत. 

देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. तर, दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना कालावधीत कोविड सेंटर, वैद्यकीय कॉलेज आणि रुग्णालयांच्या व्यवस्थेकडे प्राधान्याने लक्ष दिले. तसेच, दिल्लीकरांच्या सेवेसाठी सरकार सदैव तत्पर असल्याचेही आपल्या कृतीतून दाखवून दिले. मात्र, कोरोना कालावधीत केवळ भाजपा नेत्याने उभारले म्हणून एका कोविड केअर सेंटरचा वापर केला नसल्याचा गंभीर आरोप भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी केला आहे. ''एकत्र येऊन काम करुया, अशा बाता करता, पण गेल्या महिन्यांपासून तयार असलेल्या कोविड सेंटरला अद्याप सुरू केले नाही. कारण, आम्ही बनवलंय म्हणून हे बंद आहे. आता, दिवसाला-4-4 हजार रुग्णसंख्या आढळून येत आहे. केजरीवालजी, महामारीच्या काळात असे लज्जास्पद राजकारण योग्य नाही. लवकरात, लवकर... सेंटर खुली करावीत,'' असे गंभीर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.  

देशात 70 लाख रुग्णसंख्या होईल.

भारतामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येने ७० लाखांचा आकडा पार केलेला असेल. टी. एस. एल. राधिका या बीट्स पिलानी या शिक्षणसंस्थेमध्ये गणित प्राध्यापिका आहेत. त्यांनी सांगितले, आगामी काळात भारतात कोरोनाची स्थिती कशी असेल याचा वेध घेण्यासाठी आम्ही संख्याशास्त्रातील ४-५ पद्धतींचा वापर केला. रुग्णसंख्येबाबत भारत ब्राझीलवर ५ किंवा ६ सप्टेंबर रोजी मात करील असे भाकीत आम्ही केले होते. 

झोपडपट्ट्यांवर केजरीवाल यांचा भाजपावर निशाणा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं दिल्लीतील रेल्वे रूळांनजीक झोपड्या तोडण्याच्या निर्णयावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. या महिन्याच्या शेवटी झोपड्या हटवण्याचाी नोटीस केंद्र सरकारने जारी केल्याने तेथील लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. अरविंद केजरीवाल जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत कोणीही कोणाचंही घरं तोडू शकत नाही असं आपने म्हटलं आहे. गरज भासल्यास या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्यात येणार असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :गौतम गंभीरकोरोना वायरस बातम्याआपअरविंद केजरीवाल