‘तो’ कॉन्स्टेबल बेपत्ता ?

By Admin | Updated: December 13, 2015 01:38 IST2015-12-13T01:38:46+5:302015-12-13T01:38:46+5:30

‘हिट अँड रन’नंतर सलमान खानला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणारा कॉन्स्टेबल बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘२९८५’ हा बक्कल क्रमांक असलेला

'So' constable missing? | ‘तो’ कॉन्स्टेबल बेपत्ता ?

‘तो’ कॉन्स्टेबल बेपत्ता ?

मुंबई : ‘हिट अँड रन’नंतर सलमान खानला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणारा कॉन्स्टेबल बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘२९८५’ हा बक्कल क्रमांक असलेला कॉन्स्टेबलने सलमानला जे.जे. रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. उच्च न्यायालयात सुनावणीवेळी पोलिसांनी मात्र तो ‘मिसिंग’ असल्याचे नमूद करीत, साक्षीसाठी हजर करण्याची खबरदारी घेतली नाही. या खटल्याच्या निकालापूर्वीच्या सुनावणीमध्ये २९८५ बक्कल क्रमांक असलेल्या कॉन्स्टेबलची साक्ष महत्त्वाची होती. मात्र, मुंबई पोलिसांनी त्याला हजर केले नव्हते. त्याऐवजी फौजदार साळुंखेकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. बचाव पक्षासाठी तेच महत्त्वाचे ठरले.

Web Title: 'So' constable missing?