स्नेहल गोरेने जिंकला मिस ठाणे किताब
By Admin | Updated: December 31, 2014 22:34 IST2014-12-31T22:34:45+5:302014-12-31T22:34:45+5:30
गेल्या आठवडाभर रंगलेल्या ब्रम्हांड फेस्टीवलची सांगता ‘मिस ठाणे- फेस आॅफ द इयर’ या स्पर्धेने झाली. या स्पर्धेत स्रेहल गोरे या मराठमोठया तरुणीने ‘मिस ठाणे’ चा मुकूट पटकविला.

स्नेहल गोरेने जिंकला मिस ठाणे किताब
ठाणे : गेल्या आठवडाभर रंगलेल्या ब्रम्हांड फेस्टीवलची सांगता ‘मिस ठाणे- फेस आॅफ द इयर’ या स्पर्धेने झाली. या स्पर्धेत स्रेहल गोरे या मराठमोठया तरुणीने ‘मिस ठाणे’ चा मुकूट पटकविला.
‘अर्पण फाऊंडेशन’च्या वतीने ब्रम्हांड येथील ठाणे महापालिकेच्या मैदानात २१ ते २८ डिसेंबर दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गायन, नृत्य, संगीत या कलांबरोबरच चित्रकला, पाककला, रांगोळी अशा विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा यानिमित्ताने ठाणेकरांना आस्वाद घेतला. नृत्य, बुद्धीमत्ता चाचणी अशा विविध फेऱ्यांच्या निकषावर झालेल्या ‘मिस ठाणे फेस आॅफ द इयर’ या स्पर्धेत २० तरुणींनी सहभाग घेतला. त्यामध्ये बुद्धी आणि सौंदर्य या सर्वांतच स्रेहा गोरे ही सरस ठरली. सर्व परीक्षकांच्या चाचणीत तिने हा मुकूट मिळविला तेंव्हा टाळयांचा एकच कडकडाट झाला. यात भवानी कृष्णस्वामी दुसरी तर दिव्या बागायतकर तिसऱ्या क्रमांकाने विजेती ठरली. ब्युटीफूल स्माईल (सुहास्य) डॉ. नम्रता बेंद्रे, मिस टॅलेंट मृणाल वाघ तर मिस कॉन्जेनिअॅलिटीचा किताब प्रेरणा अचान हिने पटकविला. विजेत्यांना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, ज्योस्रा चंडोल, अभिनेते स्वप्नील जोशी, अपर्णा फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका भावना डुंबरे, नगरसेवक मनोहर डुंबरे, अॅड. जयाप्रदा शिरसाठ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण पुष्कर जोग आणि शैलेश रायकर यांनी केले.‘ब्रम्हांड अचिव्हर्स’ पुरस्काराने व्ही. शिवकुमार आणि सीमा राजेशिर्के यांना सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ चित्रकार महेश आंजर्लेकर, विजयराज बोधनकर, राजेंद्र घाटे, अभिनेते विजय पाटकर, ठाणे जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक बाबाजी पाटील, निवृत्त कर्नल शैलेश रायकर, संध्या सेठ, उमा रायकर, ‘नच बलिए’ फेम पुष्कर जोग यांच्या हस्ते झाला. सोनाली कुलकर्णी आणि पूजा सावंत यांच्या नृत्याविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली. रिदम ग्रुपने सादर केलेल्या ‘माय मराठी गाणं आमचं लाख मोलाचं’आणि ‘ही पोळी साजूक तुपातली’ या नृत्यावर रसिकांनी ठेका धरला होता. ‘मिस ठाणे...’ तसेच स्टाईल मॅटीक, ग्रुव्ह फेस्ट या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका मेघा संपत यांनी केले होते. (प्रतिनिधी)