‘बाँबे वेल्वेट’वरून टिष्ट्वटर युद्ध
By Admin | Updated: May 20, 2015 00:39 IST2015-05-20T00:39:42+5:302015-05-20T00:39:42+5:30
‘बाँबे वेल्वेट’ बॉक्स आॅफीसवर चारीमुंड्या चीत झाल्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि एकेकाळचा त्यांचा गुरू रामगोपाल वर्मा यांच्यात टिष्ट्वटर युद्ध भडकले आहे.

‘बाँबे वेल्वेट’वरून टिष्ट्वटर युद्ध
मुंबई : ‘बाँबे वेल्वेट’ बॉक्स आॅफीसवर चारीमुंड्या चीत झाल्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि एकेकाळचा त्यांचा गुरू रामगोपाल वर्मा यांच्यात टिष्ट्वटर युद्ध भडकले आहे. वर्मांनी बाँबे वेल्वेटची थट्टा करताना कश्यपवर टीका केली तर अनुरागनेही वर्मांना त्याच भाषेत उत्तर दिले. या वादात दोन्ही गटांकडून वर्मांच्या ‘आग’चा उल्लेख झाला व त्यावर कश्यपने वर्मांची खिल्ली उडविली.
‘बाँबे वेल्वेट’ झळकल्यानंतर वर्मांनी टिष्ट्वटरवर म्हटले होते की, जोपर्यंत प्रत्येक जण आगीत स्वत: भाजून निघत नाही तोपर्यंत तो आग तयार करतो. अनुरागला लक्ष्य करून रामगोपाल वर्मांनी पुढच्या टिष्ट्वटमध्ये म्हटले होते की, प्रेक्षकांनी धुडकावून लावलेल्या चित्रपटाच्या पाठिशी उभ्या राहणाऱ्या दिग्दर्शकाची अवस्था अशी असते की एखाद्याने मुलीला म्हणावे की मी माझ्यावर अमर्याद प्रेम करतो. तू माझ्यावर प्रेम करते की नाही याची मला पर्वा नाही.
वर्मांच्या या शब्दप्रयोगामुळे तिळपापड झालेल्या कश्यपने त्यांना ‘बिअर पिऊन झोपा’ असा सल्ला दिला. त्यावर वर्मांनी ‘मी दारू पिणे सोडून दिले’, असे उत्तर दिले. वर्मांनी पुन्हा एकदा ‘आग’चा उल्लेख केला व चहासोबत ‘आग’चा आनंदोत्सव साजरा करायला तयार असल्याचे म्हटले.
रामगोपाल वर्मांच्या ‘सत्या’चे सहलेखक म्हणून काम केलेल्या अनुराग कश्यप आणि वर्मा यांच्यामध्ये पहिल्यांदा वादावादी झाली ती वर्मांनी ‘शोले’चा रिमेक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा. तेव्हा अनुरागने वर्मांना निराशावादी व्यक्ती असल्याचे सांगून चित्रपटावर खूप टीकाही केली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये विस्तवही जात नाही. कश्यपने नंतर वर्मांच्या प्रत्येक चित्रपटावर टीका केली तर वर्मांनी याची भरपाई कश्यपच्या ‘गँग्ज आॅफ वासेपूर’ चित्रपटावर तोंडसुख घेऊन केली.
अनुरागशिवाय रामगोपाल वर्मांचे टिष्ट्वटर युद्ध करण जोहरशीही झाले. ‘बाँबे वेल्वेट’मध्ये करण जोहरने भूमिकाही केली आहे. वर्मांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये करण जोहरला चित्रपटाचे वेल्वेट असल्याचे म्हटले. ‘कुछ कुछ होता है’ पासून ‘स्टुडंट आॅफ द ईयर’पर्यंत करण जोहरच्या प्रत्येक चित्रपटावर रामगोपाल वर्मांनी टीका केलेली आहे.