औषधांची आॅनलाइन विक्री स्नॅपडीलला भोवली

By Admin | Updated: April 18, 2015 01:52 IST2015-04-18T01:52:10+5:302015-04-18T01:52:10+5:30

केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या अधिसूचित मोडणाऱ्या ‘व्हिगोरा’ या कामवर्धक (सेक्स) गोळ्यांची आॅनलाइन विक्री करणाऱ्या ‘स्नॅपडील’वर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली

Snapshots of online sales of medicines | औषधांची आॅनलाइन विक्री स्नॅपडीलला भोवली

औषधांची आॅनलाइन विक्री स्नॅपडीलला भोवली

अतुल कुलकर्णी - मुंबई
केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या अधिसूचित मोडणाऱ्या ‘व्हिगोरा’ या कामवर्धक (सेक्स) गोळ्यांची आॅनलाइन विक्री
करणाऱ्या ‘स्नॅपडील’वर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली खरी; परंतु केवळ लेखी आश्वासन घेऊन संबंधित कंपनीला सोडून देण्यात आले.
मुळात हे औषध मधुमेह, हृदयविकार आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना देऊ नये, असे या गोळ्यांच्या पाकिटावर छापलेले असते. शिवाय एफडीएने राज्यातल्या सगळ्या औषध विक्रेत्यांना या गोळ्या विना प्रिस्क्रिप्शन विकू नयेत, या विषयाशी संबंधित डॉक्टरांकडून दोन प्रिस्क्रिप्शन घेण्यात यावीत़ एक प्रत दुकानात ठेवावी, कोणत्या रुग्णांना या गोळ्या विकल्या जातात त्याची नोंद ठेवावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. मात्र, औषधविक्रीचा परवाना आणि फार्मासिस्ट नसताना स्रॅपडीलवर आॅनलाईन विक्री राजरोसपणे चालू होती.
हा सगळा प्रकार एफडीआयचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली. संबंधीत कंपनीला हे औषध वेबसाईटवरुन काढून टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या. कंपनीने तसे दिल्ली आॅफीसचे आदित्य राणा यांना कळवले आणि त्यांनी हे औषध वेबसाईटवरुन काढून टाकल्याचा इमेल मुंबईच्या गोरेगाव आॅफीसमध्ये पाठवला. तो मेल अनुराग सिंग यांनी आणून दिला, असे एफडीआयच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
एफडीआयने केलेल्या या कारवाईबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत. एखाद्या छोट्या औषध विक्रेत्याने औषध विक्रीचा परवाना दर्शनी भागात ठेवला नाही; या एवढ्याशा कारणावरुन दुकानाचा परवाना महिनाभर निलंबित केला जातो. हाच नियम या कंपनीला का लावला नाही? फौजदारी स्वरुपाचा गुन्हा असतानाही तशी कारवाई न करता त्यांना सोडून देण्याची कृती धक्कादायक असल्याचे फार्मासिस्ट संघटनेचे उमेश खके यांचे म्हणणे आहे. ‘व्हिगोरा’ सोबतच ‘अ‍ॅस्कॉरिल’ हे खोकल्याचे औषध देखील स्नॅपडीलने आॅनलाईन विकणे सुरु केले होते. मध्यंतरी खोकल्याची औषधे नशा येण्यासाठी तरुण मुलं सर्रास वापरातात अशा बातम्या आल्यानंतर कारवाई करण्यात आली होती.



स्नॅपडीलचे गोडावून १ लाख स्के.फुटाचे आहे. त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. सगळ्या तपासण्या करुनच कारवाई केली जाईल. फौजदारी गुन्हा दाखल होण्यास वेळ लागेल, असे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. सकृतदर्शनी एफआयरआर झालेला नाही हे लक्षात आणून दिले तेव्हा ते म्हणाले, आम्ही कारवाई करु, त्याविषयी निश्चींत रहा.



च्‘व्हिगोरा’सोबतच ‘अ‍ॅस्कॉरिल’ हे खोकल्याचे औषध देखील स्नॅपडीलने आॅनलाइन विकणे सुरू केले होते.
च्औषधांची अशीच विक्री फ्लीपकार्ट आणि अमॅझॉन यांच्या वेबसाइटवरही चालू आहे का याचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

Web Title: Snapshots of online sales of medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.