अग्निशमन दलाच्या जवानास सर्पदंश; गमबूट असताना देखील चावला साप

By धीरज परब | Published: December 7, 2022 06:52 PM2022-12-07T18:52:40+5:302022-12-07T18:52:48+5:30

भाईंदरच्या मुर्धा गावात साप पकडण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलातील कंत्राटी जवानास सापाने दंश केल्याची घटना घडली आहे .

Snakebite to Firefighter; Snake bites even when gumbooted | अग्निशमन दलाच्या जवानास सर्पदंश; गमबूट असताना देखील चावला साप

अग्निशमन दलाच्या जवानास सर्पदंश; गमबूट असताना देखील चावला साप

googlenewsNext

मीरारोड - भाईंदरच्या मुर्धा गावात साप पकडण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलातील कंत्राटी जवानास सापाने दंश केल्याची घटना घडली आहे . जवानांशी रुग्णालयात दाखल केले असून पायात गमबूट असताना देखील सापाने चावा घेऊन जखमी केल्याच्या प्रकाराने कामगार संघटनेने साहित्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे . 

मीरा भाईंदर शहरात नागरी वस्तीत साप आदी दिसल्याची खबर मिळताच ते पकडण्याचे काम अग्निशमन दल करत आले आहे . परंतु मध्यंतरी अग्निशमन दलाच्या जवानांना साप आदी वन्यजीव पकडण्याचे आणि त्यांना कसे हाताळावे याचे ज्ञान नसल्याने तसेच साप पकडताना त्यांना इजा होणे , एकाच ठिकाणी सापांना एकत्र ठेवणे आदी प्रकरांवरून वन विभागाने अग्निशमन  दलास साप आदी वन्यजीव पकडू नये म्हणून लेखी मनाई करण्यात आली होती . कारवाईचा इशारा देखील दिला होता . 

त्यामुळे अग्निशमन दला कडून सामान्य नागरिकांना साप आल्याची तक्रार केल्यास वन विभागा कडे बोट दाखवले जात होते . परंतु तेच अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान मात्र त्यावेळच्या नगरसेवक ने कॉल केल्यास तात्काळ गुडघ्याला बाशिंग बांधून मदतीसाठी धावत जायचे . त्यामुळे नागरिकां मध्ये अग्निशमन दलाच्या दुटप्पी आणि सापत्न वागणुकी बद्दल संताप व्यक्त होत होता . 

नंतर मात्र काही जवानांना साप पकडण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरले व अग्निशमन दलाचे जवान पुन्हा साप पकडू लागले . परंतु मंगळवारी सायंकाळी भाईंदरच्या मुर्धा गावातील गावदेवी मंदिर जवळ असलेल्या खंडोबा हाऊस भागात दोन साप आले होते . त्याची खबर भाईंदर अग्निशमन केंद्रास मिळाल्यावर साप पकडण्यासाठी जवान दाखल झाले . 

त्यावेळी साप पकडत असताना कंत्राटी जवान असलेल्या राहुल निळकंठ म्हात्रे ह्याच्या पायावर सापाने जोरदार चावा घेतला . पायात गमबूट असून सुद्धा सापाने दंश केल्याने जखमी म्हात्रे ह्याला नजीकच्या शासकीय पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . म्हात्रे हा भाईंदरच्या खारी गावातील राहणारा आहे . 

ह्या घटनेची माहिती मिळताच श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल व सहकारी , अग्निशमन दलाचे अधिकारी जगदीश पाटील आदी रुग्णालयात पोहचले व म्हात्रेची विचारपूस केली . पायात गमबूट असताना सुद्धा सापाने चावा घेत दंश करणे म्हणजे जवानांना सुरक्षेसाठी दिले जाणारे साहित्य हे निकृष्ठ व सुमार दर्जाचे असल्याचे स्पष्ट होत असल्याने या प्रकरणी कारवाईची मागणी पटेल यांनी केली आहे . कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची आयुक्त दिलीप ढोले हे गय करणार नाहीत अशी अपेक्षा असल्याचे पटेल म्हणाले . 

Web Title: Snakebite to Firefighter; Snake bites even when gumbooted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई