जुहू बीचवर आला नागोबा, जीवरक्षकांनी पकडून वनखात्याच्या स्वाधीन केले
By मनोहर कुंभेजकर | Updated: August 11, 2023 20:00 IST2023-08-11T19:59:40+5:302023-08-11T20:00:11+5:30
मुंबई - समुद्रात उतरून गटांगळ्या खाणाऱ्या पर्यटकांना जीवरक्षकांना वाचवण्याचे काम जीवरक्षक डोळ्यात तेल घालून करतात.पण आज चक्क जुहू बीचवर आलेल्या ...

जुहू बीचवर आला नागोबा, जीवरक्षकांनी पकडून वनखात्याच्या स्वाधीन केले
मुंबई- समुद्रात उतरून गटांगळ्या खाणाऱ्या पर्यटकांना जीवरक्षकांना वाचवण्याचे काम जीवरक्षक डोळ्यात तेल घालून करतात.पण आज चक्क जुहू बीचवर आलेल्या नागोबाला जेरबंद करण्याची वेळ आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,जुहू बीचवर आज सकाळी ब्ल्यू बोटल्स जेलिफिश आल्याची घटना ताजी असतांनाच आज दुपारी २.१५च्या सुमारास चक्क येथील गोदरेज बंगल्या समोरील बीच वर नागोबा येथील जीवरक्षकांना आढळून आला.जीवरक्षक विकी तांडेल यांनी मग त्याला शिफायतीने पकडून बाटलीत जेरबंद केले.आम्ही वन खात्याला फोन केल्यावर ते या नागोबाला घेवून गेले अशी माहिती येथील जीवरक्षक मनोहर शेट्टी यांनी लोकमतला दिली.