सायकलच्या सीटमधून तस्करी
By Admin | Updated: November 16, 2014 01:53 IST2014-11-16T01:53:04+5:302014-11-16T01:53:04+5:30
पार्टी ड्रग्ज बनविण्यासाठी उपयुक्त ठरणारा अॅफेड्रीन हा अमलीपदार्थ कुरिअरच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेत धाडू पाहणा:या एका नायजेरियन तरुणाला गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे.

सायकलच्या सीटमधून तस्करी
मुंबई : पार्टी ड्रग्ज बनविण्यासाठी उपयुक्त ठरणारा अॅफेड्रीन हा अमलीपदार्थ कुरिअरच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेत धाडू पाहणा:या एका नायजेरियन तरुणाला गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. अलोझी लॉम्बर्ड असे या तरुणाचे नाव असून, त्याने सायकलच्या सीटमध्ये अॅफेड्रीनची पूड दडवली होती. या सीट्स घेऊन तो दक्षिण मुंबईतल्या कुरिअर कंपनीत आला होता.
अमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त नामदेव चव्हाण यांना अलोझीबाबत आगाऊ माहिती मिळाली होती. या माहितीतील तत्थ्यता पडताळून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी वरळी युनिटचे वरिष्ठ निरीक्षक दिवाकर शेळके यांना दिले. त्यानुसार शेळके व पथकाने महोम्मदअली रोडवरील लहेरी हाउस येथील एका कुरिअर कंपनीजवळ सापळा रचला.
चव्हाण यांनी दिलेल्या वर्णनाप्रमाणो एक नायजेरियन तरुण दुकानात शिरणार इतक्यात पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अलोझी असे सांगितले. त्याच्याकडील बॅगेत पथकाला सायकलच्या 11 सीट्स आढळल्या. या सीट्सवरील कातडी कव्हर फाडून आत चाचपणी केली असता पथकाला अॅफेड्रीन भरलेल्या सुमारे 11 पिशव्या आढळल्या. मोजदाद केल्यावर सुमारे 2 किलो अॅफेड्रीन भरले. या साठय़ाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत 2 लाख रुपये असल्याचे सांगितले.
ऑगस्ट महिन्यात बिझनेस व्हिसावर मुंबईत आलेल्या अलोझीला हे सामान त्याच्या दुस:या साथीदाराने दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. हे सामान तो दक्षिण आफ्रिकेत धाडणार होता, अशी माहिती पथकाला मिळाली आहे. त्यानुसार पथकाने अलोझीच्या दुस:या साथीदाराचा शोध सुरू केला आहे.
अॅफेड्रीन हा पार्टीड्रग बनविण्यासाठी कच्च पदार्थ म्हणून वापरला जातो. अॅफेड्रीनमध्ये रासायनिक प्रक्रिया करून अॅम्फेटामाईन, मेथा अॅम्फेटामाईन हे अमलीपदार्थ तयार होतात. पुढे त्यावरही प्रक्रिया करून एमडीएमए, एलएसडीसारखे पार्टीड्रग्ज तयार केले जातात. त्यामुळे अॅफेड्रीनच्या या तस्करीप्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असावी असा संशय गुन्हे शाखेला आहे. तसेच अलोझीसारख्या मुंबईत नव्याने आलेल्या नायजेरियन तरुणांचा अॅफेड्रीन किंवा अन्य अमलीपदार्थाच्या तस्करीसाठी ही टोळी वापर करत असावी, असा अंदाजही गुन्हे शाखेकडून व्यक्त होत आहे. तूर्तास अलोझीला 18 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडे वरळी युनिट कसून चौकशी करते
आहे. (प्रतिनिधी)
‘मैदा है वह’, त्याच्या रोटय़ा करता येतील
सायकलच्या सीटमध्ये दडविलेले अॅफेड्रीन पथकाच्या हाती लागले तेव्हा ‘हा तर मैदा आहे. पाण्यात मिसळून त्याच्या रोटय़ा करता येतील,’ असे अलोझी सांगू लागला. मात्र अमलीपदार्थविरोधी पथकातील तज्ज्ञ व प्रशिक्षित अधिका:यांनी हा मैदा नसून अॅफेड्रीन असल्याचे ओळखलेच.
अॅफेड्रीनचा वापर भारतात औषधनिर्मितीसाठी, भूल पडणा:या औषधांमध्ये केला जातो. शासनाच्या अटी व नियमांप्रमाणो औषधनिर्मिती कंपन्यांना हा पदार्थ अंदाजे 1क् हजार रुपये किलोने पडतो.
अॅफेड्रीनच्या सेवनाने एकाग्रता वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते, या समजाने महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा बडय़ा कंपन्या, बीपीओ, कॉलसेंटरमध्ये ढोरमेहनत करणारे कर्मचारीही या पदार्थाचे सेवन करताना आढळतात.