Join us

आरेत धूमाकूळ घालणारा बिबट्या अखेर झाला जेरबंद; वनखात्याची धडक करावाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 21:46 IST

आरेत धूमाकूळ घालणारा बिबट्या अखेर झाला जेरबंद; वनखात्याची धडक करावाई- मनोहर कुंभेजकर मुंबई- गेली दीड महिने आरेत ...

आरेत धूमाकूळ घालणारा बिबट्या अखेर झाला जेरबंद; वनखात्याची धडक करावाई

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई- गेली दीड महिने आरेत धूमाकूळ घालणारा दुसरा बिबट्या  आज पहाटेच्या सुमारास युनिट क्रमांक 13 मध्ये वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आणि आरेवासीयांनी सुटकेचा निस्वारा टाकला.वनखात्याच्या सहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई यांनी आजच्या दसऱ्याच्या दिवशी शुभवर्तमानाची बातमी लोकमतला दिली. यामुळे आता येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेली दीड महिना वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी डोळ्यात तेल घालून  आरेतील बिबट्यांवर जागता पहारा ठेवत असून येथे त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे देखिल तैनात केले आहे.

गेल्या दि,1 ऑक्टोबर रोजी आरे युनिट नंबर 3 मध्ये  वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी जेरबंद झाली होती लावला होता.त्या आधी दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे पिल्लू देखिल सापडले होते. गेली दीड महिना आरेत बिबट्याची दहशत असून या दरम्यान आरेतील सात नागरिकांवर बिबट्याने हल्ला केल्याने येथील नागरिक भयभीत झाले होते.

वनखात्याची धडक करावाईत अखेर आज पहाटे   बिबट्या पिंजऱ्याच्या सापळ्यात जेरबंद झाला.आणि बिबट्याची मादी पकडल्याची बातमी आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.मात्र अजूनही येथे 6 ते 7 बिबटे असून त्यांनासुद्धा वनखात्याने लवकर जेरबंद करावे अशी मागणी आरेवासीयांनी केली आहे.

आरेत धूमाकूळ घालणारी हीच बिबट्याची मादी आहे का याची आम्ही यशनिशा करणार असल्याचे गिरीजा देसाई म्हणाल्या. लोकमत ऑनलाईन आणि लोकमत मधून आरे आणि न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याच्या ठवठिकाण्याच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधी,वनखात्याचे लक्ष वेधले होते.

गेल्या दीड महिनाभरात आरेत सात जणांवर बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्या रात्री अंधार पडल्यावर नागरिकांवर हल्ला करतो. त्यामुळे येथील नागरिक रात्री काय दिवसा सुद्धा घरातून बाहेर पडायला घाबरत होते.आता बिबट्याची दुसरी मादी जेरबंद झाली असली तरी येथील उर्वरित बिनट्यांना देखिल जेरबंद करावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश धुरी यांनी केली. 

टॅग्स :आरे