स्मिता संधाने सारस्वतच्या पहिल्या महिला ‘एमडी’
By Admin | Updated: April 10, 2017 00:37 IST2017-04-10T00:37:09+5:302017-04-10T00:37:09+5:30
शंभराव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या सारस्वत सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी स्मिता संधाने यांची नियुक्ती

स्मिता संधाने सारस्वतच्या पहिल्या महिला ‘एमडी’
मुंबई : शंभराव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या सारस्वत सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी स्मिता संधाने यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्या बँकेच्या इतिहासातील पहिल्या महिला एमडी नियुक्त झाल्या आहेत.
एस.के. बॅनर्जी ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर स्मिता संधाने यांनी पदभार स्वीकारला. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात त्यांची सहव्यवस्थापकीय संचालिका
म्हणून निुयक्ती झाली होती. त्यांनी यापूर्वी बँकिंग, प्लॅनिंग, अकाऊंट्स आणि स्ट्रेस्ड अॅसेट्स अशा विविध क्षेत्रांच्या विभागप्रमूख म्हणूनही काम पाहिलेले आहे. बुडित असलेल्या तीन बँकांचे सारस्वतमध्ये विलीनीकरण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. (वाणिज्य प्रतिनिधी)