Join us

मुख्यमंत्र्यांची भेट मिळाल्यावर पार्लेकर महिलांच्या चेहऱ्यावर फुलले हसू!

By मनोहर कुंभेजकर | Updated: September 29, 2022 17:18 IST

नवरात्रीच्या शुभ काळात राजकारणाशी कोणताही संबंध नसताना केवळ प्रेमापोटी आपल्याला भेटायला आलेल्या पार्लेकर महिलांची मुख्यमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस केली.

मुंबई- मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जावून सर्वसामान्य नागरिकांना सहजासहजी मुख्यमंत्र्यांची भेट मिळणे तसे फार दुर्मिळच असते. पण आपल्याला फक्त "साहेबांना भेटायचयं, बाकी काही नको"अशी विनंती करत विलेपार्ले येथून काही महिला राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्धल एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी वर्षा बंगल्यावर आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

नवरात्रीच्या शुभ काळात राजकारणाशी कोणताही संबंध नसताना केवळ प्रेमापोटी आपल्याला भेटायला आलेल्या पार्लेकर महिलांची मुख्यमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस केली. आणि त्या महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलत होते. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी लोकमतला ही माहिती दिली. "हे आहे सर्व सामान्यांचे सरकार" अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

टॅग्स :मुंबईएकनाथ शिंदेशिवसेना