आयआयटीयन्सचे स्मार्ट सिटी मॉडेल...
By Admin | Updated: January 6, 2015 01:01 IST2015-01-06T01:01:26+5:302015-01-06T01:01:26+5:30
देशात १०० स्मार्ट शहरे तयार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र्र मोदींचा मानस आहे. मुंबईच्या आयआयटीयन्सनी त्यांंच्या कल्पनेतील स्मार्ट सिटीचे मॉडेल सर्वांसमोर मांडले.

आयआयटीयन्सचे स्मार्ट सिटी मॉडेल...
मुंबई : देशात १०० स्मार्ट शहरे तयार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र्र मोदींचा मानस आहे. मुंबईच्या आयआयटीयन्सनी त्यांंच्या कल्पनेतील स्मार्ट सिटीचे मॉडेल सर्वांसमोर मांडले. तरुणाईने ‘स्मार्ट सिटी चॅलेंज’ हे शहर व तेथील नागरिकांच्या विकासासाठी तरुणांना त्यांच्या कल्पना मांडता याव्यात यासाठी हा अनोखा प्रकल्प राबविण्यात आला. या स्मार्ट चॅलेंजच्या अनोख्या उपक्रमात विद्यार्थी दंगलेले होते.
या चॅलेंजमध्ये विद्यार्थ्यांना एक शेअरिंग प्लॅटफॉर्म मिळाल्याने कल्पनांची देवाणघेवाण झाली. देशात नवीन एकात्मिक पद्धतीने स्मार्ट शहरांचा विकास करण्याच्या संकल्पनांना एकत्रित करण्याची संधी मिळालेली दिसली. मुळात आयआयटीयन्सने मांडलेल्या या विचारामध्ये पर्यावरणाला अनुकूल तंत्रज्ञानात एकात्मिक आणि काटेकोरपणे अंमलबजावणीची कार्यक्षमता सुधारण्यासाठीची माहिती तर मिळालीच तसेच तंत्रज्ञानाच्या वापराची चर्चाही केली गेली. त्यातून विकसित भारतीय समुदाय गुंतविण्यासाठीची विद्यार्थ्यांच्या एका दृष्टीतील डिझाइन यामध्ये दिसून आले. विशेष म्हणजे या वेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), शहर आणि महाराष्ट्र (सिडको), औद्योगिक विकास महामंडळ आणि दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळासारखे शासकीय पॅनल या वेळी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे आयआयटीयन्सने या वेळी मांडलेल्या कल्पनांंची अंमलबजावणी संबंधित सरकारी संस्था करणार आहे. (प्रतिनिधी)
व्यापार आणि वाणिज्य संसाधनांचा योग्य उपयोग आणि पर्यावरणीय समस्या न वाढवता जीवन दर्जा सुधारण्यासाठी संधी निर्माण करणे, कायदा आणि धोरण घेणे, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान उद्भवलेल्या नागरी मध्ये खीळ प्रगती नियामक लँडस्केप तपासत आहे.
पायाभूत सुविधा आमच्या दैनंदिन गरजा प्रतिसाद पायाभूत सुविधा विकास अभिनव आणि स्मार्ट उपाय निर्माण.
आरोग्य व स्वच्छता अकार्यक्षम आरोग्य आणि कचरा विल्हेवाट समस्या कमी करण्यासाठी नवीन आणि गंभीर उपाय शोधणे.
शहरी सौंदर्यशास्त्र तुमची शहरे सौंदर्यशास्त्रविषयक सुखकारक आणि राहतात मनोरंजक स्थान निर्माण.