मध्य रेल्वेवर सरकत्या जिन्यांचा वर्षाव

By Admin | Updated: August 28, 2015 02:15 IST2015-08-28T02:15:09+5:302015-08-28T02:15:09+5:30

मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बरवर सरकत्या जिन्यांचा वर्षावच होणार आहे. डिसेंबर २0१६ पर्यंत तब्बल ३0 सरकते जिने बसवण्याचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

Sloping to the Central Railway | मध्य रेल्वेवर सरकत्या जिन्यांचा वर्षाव

मध्य रेल्वेवर सरकत्या जिन्यांचा वर्षाव

मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बरवर सरकत्या जिन्यांचा वर्षावच होणार आहे. डिसेंबर २0१६ पर्यंत तब्बल ३0 सरकते जिने बसवण्याचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
दादर, घाटकोपर,ठाणे, कल्याण, स्थानकांवर सरकते जिने बसवण्यात आले आणि त्याचा अनेक प्रवासी वापर करत आहेत. त्यामुळे आता आणखी काही स्थानकांवर सरकते जिने बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत विविध स्थानकांवर मिळून ३० सरकते जिने बसवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले. मार्च २०१६ पर्यंत १० सरकते जिने बसवण्यात येतील. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कुर्ला, विद्याविहार, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड आणि बदलापूर तर हार्बरवर वडाळा, मानखुर्द स्थानकात मिळून दहा सरकते जिने बसविले जातील. मुलुंड स्थानकात सरकता जिना हा नोव्हेंबरपर्यंत बसवण्यात येईल, असे झा म्हणाले. बसवण्यात येणाऱ्या काही सरकत्या जिन्यांचे नियोजन हे एमआरव्हीसीकडूनही (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sloping to the Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.