‘आयुक्त हटाव’चा नारा!

By Admin | Updated: March 8, 2015 02:20 IST2015-03-08T02:20:52+5:302015-03-08T02:20:52+5:30

सत्ताधारी शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीत विरोधकांसाठी गळचेपी धोरण सुरू असून, कल्याण-डोंबिवली महापालिका ही काय शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का?

Slogan 'Removal of commissioner'! | ‘आयुक्त हटाव’चा नारा!

‘आयुक्त हटाव’चा नारा!

डोंबिवली : सत्ताधारी शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीत विरोधकांसाठी गळचेपी धोरण सुरू असून, कल्याण-डोंबिवली महापालिका ही काय शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का? विरोधकांना सोडाच, परंतु सत्तेत वाटेकरी असलेल्या भाजपालाही येथे विचारात घेतले जात नाही़ सत्ता म्हणजे मनमानी कारभार करायचा काय, असा सवाल करून काँग्रेसचे नगरसेवक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी राष्ट्रवादी व मनसेच्या नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना हाताशी घेऊन शिवसेनेच्या मनमानी कारभारावर हल्लाबोल केला आहे. तसेच त्यास साथ देणाऱ्या आयुक्तांविरोधात ‘आयुक्त हटाव’चा नारा त्यांनी दिल्याने शनिवारी महापालिकेच्या मुख्यालयात गोंधळासह तणावाचे वातावरण होते.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सत्ताधाऱ्यांव्यतिरीक्त विरोधी पक्षनेते, मनसेचे गटनेते, राष्ट्रवादीचे गटनेते आदींना डावलून येथील विकास प्रकल्पांबाबत सविस्तर सहा तासांची चर्चा केली. त्या चर्चेत आयुक्तांना अनेक सूचना केल्या़ दोघा अभियंत्यांवर निलंबनाचे आदेशही देण्यात आले. हे निर्णय घेतांना विरोधकांना विश्वासात का घेतले नाही? असा सवाल करून त्यांनी आयुक्त एम. आर्दड यांना धारेवर धरले. त्याहूनही कहर म्हणजे रिंगरुट प्रकल्पासंदर्भात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसमवेत आयुक्तांची पालिका मुख्यालयात बैठक घेतली.

च्आजच्या बैठकीत सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षनेत्यांना, अन्य पक्षांच्या गटनेत्यांना विचारात घेतलेले नव्हते़ त्यामुळे आयुक्त भेदभाव करीत असल्याचा आरोप करीत सर्वजण संतापले.
च् गटनेते सर्वश्री वसंत भगत, सुदेश चुडनाईक आदींसह श्रीकर चौधरी आदींनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडून आयुक्त अर्दड हटावचा नारा देऊन महापालिका दणाणून सोडली.

च्राष्ट्रवादी काँग्रेसचे डोंबिवलीतील नगरसेवक वसंत भगत यांनी आयुक्त आर्दड यांना गुरुवारी त्यांच्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमंत्रित केले होते़ त्यावर आयुक्तांनी समस्या असतील तर पालकमंत्र्यांना सांगा, असे उत्तर दिल्याने विरोधक जास्त आक्रमक झाले.

च्परिणामी रिंगरुटची बैठक अर्धवटच सोडून संबंधित अधिकाऱ्यांसह आमदार-खासदारांनी काढता पाय घेतला. तर त्यानंतर काहींनी विरोधकांची समजूत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचेही दिसून आले.

Web Title: Slogan 'Removal of commissioner'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.