‘एक कर्मचारी, एक झाड’चा नारा
By Admin | Updated: May 28, 2014 00:06 IST2014-05-28T00:06:42+5:302014-05-28T00:06:42+5:30
घोलवड पोलिसांनी ‘एक कर्मचारी एक झाड’ हा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे. सोमवार २६ मे रोजी चिखले पोलीस चौकी येथे वृक्षारोपण कार्यक्रम झाला

‘एक कर्मचारी, एक झाड’चा नारा
बोर्डी : घोलवड पोलिसांनी ‘एक कर्मचारी एक झाड’ हा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे. सोमवार २६ मे रोजी चिखले पोलीस चौकी येथे वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी सहाय्यक पो. निरीक्षक जी. डब्ल्यू. बांगर, चिखलेचे सरपंच संदेश काटेला, तंटामुक्त अध्यक्ष अशोक किणी, संतोष गावड व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. पोलीस विभाग अपवाद नसल्याची प्रचिती घोलवड पोलिसांनी दिली. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदासह ‘एक कर्मचारी, एक झाड’ हा अभिनव उपक्रम डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे यांच्या संकल्पनेतून राबवत असल्याची माहिती स. पो. निरीक्षक जी. डब्ल्यू. बांगर यांनी दिली. महाराष्टÑ - गुजरात सीमेलगत डहाणू-बोर्डी सागरी मार्गावरील अतिशय महत्वाच्या अशा चिखले पोलीस चौकीची निवड करण्यात आली आहे. स्थानिक व भौगोलिक वातावरणाशी जुळणारी नारळ, फणस, सफेद जांभू, बदाम, कडूनिंब, करंज तसेच मोगरा, गुलाब, जाई-जुई या फुलांच्या कलमांची लागवड करण्यात आली आहे. झाडांच्या संगोपनाची जबाबदारी पो. हवालदार रवींद्र कुमावत, जगन्नाथ मुंडे, जयंत निकम, पो. शिपाई गौतम बारी यांनी स्वीकारल्याचे बांगर म्हणाले. (वार्ताहर)