वृद्धेची हत्या करणारा गजाआड
By Admin | Updated: November 12, 2015 02:56 IST2015-11-12T02:56:54+5:302015-11-12T02:56:54+5:30
येथील प्रभादेवी येथे एका वृद्धेचा भरदिवसा हत्या करून घरातील ऐवज घेऊन आरोपीला झालेल्या आरोपीला शिवाजी पार्क पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बस्ती रेल्वे स्टेशन

वृद्धेची हत्या करणारा गजाआड
मुंबई : दादर (प.) येथील प्रभादेवी येथे एका वृद्धेचा भरदिवसा हत्या
करून घरातील ऐवज घेऊन आरोपीला झालेल्या आरोपीला शिवाजी पार्क पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बस्ती रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली. मनोज रामअवतार वर्मा (वय २६, रा. सध्या धारावी, मूळ बैजनाथा, तो. शोहरतगड, जि.सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.
चार नोव्हेंबरला वर्माने बेलिझा टॉमी कार्डोजो (वय ५८) यांची हत्या करून रोख रक्कम, दागिन्यांसह घरातील १ लाख ५,५०० रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले होते. त्यांच्या घरी काम करणारा सुतार मनोज वर्मा हा सामान तसेच टाकून निघून गेला होता. त्याचा मोबाइलही बंद होता, त्यामुळे त्यानेच हे कृत्य केल्याची शक्यता होती. वर्मा राहत असलेल्या धारावी परिसरात, त्याचप्रमाणे तो कामाला असलेल्या नळ बाजार येथे चौकशी केली असता, तो कोणाला न सांगता निघून गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांची पथके धुळे येथील नातेवाईक व त्याच्या उत्तर प्रदेश येथील मूळ गावी शोधासाठी गेली होती.
त्याच्या परिचिताकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो वस्ती येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी वस्ती रेल्वे स्टेशनवर मुंबईकडून येणाऱ्या फ्लॅटफॉर्मच्या ठिकाणी पोलिसांनी पाळत ठेवली होती.
मनोज वर्मा बाहेर गावी जाण्यासाठी एका रेल्वेत बसत असताना त्याला
जेरबंद करण्यात आले. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिल्याचे परिमंडळ चारचे उपायुक्त महेश पाटील यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक अशोक जगदाळे, निरीक्षक तस्ते,
गावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत वेगाने पूर्ण केला. (प्रतिनिधी)