वीजवाहिनीसाठी केली वृक्षांची कत्तल
By Admin | Updated: February 15, 2015 23:16 IST2015-02-15T23:16:37+5:302015-02-15T23:16:37+5:30
बोईसर विद्यानगरी येथील डॉ. स.दा. वर्तक विद्यालयासमोरून नव्याने वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. यासाठी याठिकाणच्या झाडांची कत्तल करण्यात आली.

वीजवाहिनीसाठी केली वृक्षांची कत्तल
बोईसर : बोईसर विद्यानगरी येथील डॉ. स.दा. वर्तक विद्यालयासमोरून नव्याने वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. यासाठी याठिकाणच्या झाडांची कत्तल करण्यात आली. तर यातीलच एक फांदी विद्यार्थ्याच्या डोक्यावर फांदी पडून तो जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली.
या वाहिनीखाली असलेली तसेच रहिवाशांनी वृक्षारोपण करून वाढविलेले अनेक झाडे अचानक कापण्यात आली. या विरोधात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. तर कापलेल्या झाडांच्या फांद्या तशाच झाडावर ठेवल्याने नववीत शिकणाऱ्या राकेश खुशवाह या विद्यार्थ्यांवर फांदी कोसळून तो किरकोळ जखमी झाला.
सरावली सबस्टेशनहून बेटेगावच्या टाटा हाऊसिंग कॉलनी पर्यंत ३३ के.व्ही. क्षमतेची वीज वाहिनी लाईन टाटा हाऊसिंग तर्फे टाकण्याचे काम सुुरु आहे. याविरोधात विद्यानगरचे वृक्षप्रेमी रहिवासी डॉ.सुभाष संखे, संतोष पावडे, चुरी यांनी निषेध व्यक्त केला. (वार्ताहर)