स्लॅब कोसळला
By Admin | Updated: August 6, 2014 01:42 IST2014-08-06T01:42:28+5:302014-08-06T01:42:28+5:30
महागिरी कोळीवाडय़ातील तळ अधिक चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली.

स्लॅब कोसळला
ठाणो : महागिरी कोळीवाडय़ातील तळ अधिक चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. मात्र या इमारतीत राहणा:या 12 कुटुंबांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आह़े दुसरीकडे कोपरीतही लोडबेअरिंगच्या घराची भिंत कोसळली असून, येथील पाच कुटुंबांना येथून हलवले आहे.
सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास महागिरी कोळीवाडा भागात असलेली अलमिया हाउस या तळ अधिक चार मजली इमारतीचा पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या घटनेची माहिती मिळताच ठाणो महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर येथे बचावकार्य सुरू झाले आणि येथील 12 कुटुंबांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. 1986मध्ये ही अनधिकृत इमारत उभारण्यात आली होती. परंतु, आता इमारत धोकादायक झाल्याने ती पूर्णपणो तोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, त्यादृष्टीने कारवाई सुरू केली आहे.
कोपरीतील शुभम् या तळ अधिक एक मजल्याच्या लोडबेअरिंगच्या घराची मागील बाजूची भिंत कोसळल्याची घटना घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी येथील पाच कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. (प्रतिनिधी)
वरपगावात घरे कोसळली
1गेल्या आठवडय़ात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात घरे कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र मोठे नुकसान झाले आहे. मागील चार-पाच दिवसांत तालुक्यात मुसळधार पाऊस पडला.
2नद्या, नाले दुधडी भरून वाहू लागले. सखल भागांत पाणी साचल्याने कल्याण-मुरबाड मार्ग बंद पडला तर म्हारळ, कांबा, पावशेपाडा, सांगोडा, वालधुनी आदी भागांतील लोकवस्ती बाधित झाली; तर उशिद गावातील दीपक भोईर यांचे घर क्र. 19क् आणि ठाकूरपाडा येथील गणपत हिंदोळे यांचे घर कोसळले.
3या दोन्ही घटना दिवसा झाल्याने व घरातील मंडळी शेतावर गेल्याने बचावली. मात्र घरावरील कौले, लाकूडफाटा, विद्युत फिटिंग आदी मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेस सहा दिवस उलटूनही अद्याप तलाठी पंचनामा झालेला नाही.