Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोवंडीत सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपीला केली अक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 03:20 IST

गोवंडीत सहा वर्षांच्या चिमुरडीवर कारखान्यात नेत, तिच्यावर रात्रभर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. सकाळी मुलीने तेथून पळ काढत घर गाठले.

मुंबई : गोवंडीत सहा वर्षांच्या चिमुरडीवर कारखान्यात नेत, तिच्यावर रात्रभर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. सकाळी मुलीने तेथून पळ काढत घर गाठले. त्यानंतर, हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मोहम्मद रेहान अब्दुल खान (३०) याला अटक केली. गोवंडी परिसरात सहा वर्षांची चिमुरडी कुटुंबीयांसोबत राहते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास खानने तिला फिरण्याच्या बहाण्याने बाहेर नेले. पुढे एका कारखान्यात नेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सकाळी खान झोपला असताना मुलीने पळ काढला. या प्रकरणी कुटुंबीयांना माहिती मिळताच, त्यांनी तिच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :बलात्कारगुन्हा