मरिन ड्राइव्ह येथील अपघातात सहा जण जखमी

By Admin | Updated: March 23, 2017 01:56 IST2017-03-23T01:56:55+5:302017-03-23T01:56:55+5:30

मरिन ड्राइव्ह येथे बाइक आणि कारच्या झालेल्या धडकेत सहा जण जखमी झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली

Six people were injured in a road accident in Marin Drive | मरिन ड्राइव्ह येथील अपघातात सहा जण जखमी

मरिन ड्राइव्ह येथील अपघातात सहा जण जखमी

मुंबई : मरिन ड्राइव्ह येथे बाइक आणि कारच्या झालेल्या धडकेत सहा जण जखमी झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, जखमींवर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मरिन ड्राइव्ह प्लाझा हॉटेलच्या जंक्शनवर हा अपघात घडला. गिरगावमध्ये कुटुंबासोबत राहाणारा सशांक वाडके आणि मंगेश पाटील हे दोन्ही तरुण कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. मंगळवारी मध्यरात्री फेरफटका मारण्यासाठी होंडा सीबीआर या सुपरबाइकने मरिन ड्राइव्हच्या रस्त्यावर गेले होते. त्याच दरम्यान एक कार यू टर्न घेत होती. कार अचानक समोर आल्याने, भरधाव वेगात असलेल्या बाइकस्वारांनी कारच्या दरवाजाला जोराच धडक दिली. या अपघातात वाडके आणि पाटील जखमी झाले.
घटनास्थळी उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी अपघाताची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देत, दोन्ही जखमी बाइकस्वारांना उपचारांसाठी तत्काळ जी. टी. रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू आहेत, तर या अपघातात कारचालक रौनक याच्यासोबत इशा मुल्तानी, अतीत शहा आणि मनुश्री शहा हे जखमी झाले असून, सीटबेल्ट व अपघातानंतर गाडीतील एअरबॅग्ज उघडल्याने ते बचावल्याचे पोलिसांनी सांगितले. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी या घटनेची नोंद करून, तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Six people were injured in a road accident in Marin Drive