Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅटच्या नावे सहा जणांची ७३ लाख रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:06 IST

कॅबचालक बाळू शेटे यांच्या पत्नीचा मावस भाऊ प्रशांत राळे याने वर्सोवा गावातील मांडवी गल्ली येथे ‘झेमणे हाउस’ येथे फ्लॅट बुक केल्याचे सांगत इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आणखी घरे उपलब्ध असल्याची माहिती दिली.

मुंबई :  फ्लॅटच्या व्यवहारातून सहा जणांची ७२ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. अंधेरी पश्चिमेतील सात बंगला, जेपी रोड परिसरात राहणाऱ्या बाळू शेटे यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला आहे.

कॅबचालक बाळू शेटे यांच्या पत्नीचा मावस भाऊ प्रशांत राळे याने वर्सोवा गावातील मांडवी गल्ली येथे ‘झेमणे हाउस’ येथे फ्लॅट बुक केल्याचे सांगत इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आणखी घरे उपलब्ध असल्याची माहिती दिली. त्यानंतर शेटे यांनी फ्लॅट खरेदी व्यवहारासाठी करण किराड व यज्ञा झेमणे यांच्याशी बैठक करत घराची किंमत १८ लाख रुपये ठरवली. त्यापैकी १४ जून २०२४ रोजी सात लाख रुपये धनादेशाद्वारे दिले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण १५ लाख रुपये दिले. राहिलेले ३ लाख रुपये ताबा घेताना देण्याचे ठरल्याने १३ जून २०२४ रोजी नोटरी करारनामा केला. तसेच जागामालक नागेश झेमणे, जयेंद्र झेमणे व नरेंद्र झेमणे आणि विकासक करण किराड यांच्यात २८ ऑगस्ट २०२२ रोजी विकास करारनामा झाल्याचे सांगितले होते. मात्र, फ्लॅटचा ताबा दिला नाही.

या प्रकरणात शेटे यांच्यासह वैशाली साबळे, विश्वनाथ सावंत, स्वाती बधाले, प्रशांत राळे आणि हेमलता शिंदे यांचीही फसवणूक झाल्याचा आरोप आहे. आरोपी आशा झेमणे, नंदू झेमणे, अविनाश भानजी, करण किराड, यज्ञा झेमणे व मुर्तजा भावनगरवाला यांनी संगनमत करून एकूण ७२ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Flat Fraud: Six Victims Lose ₹73 Lakh; Case Filed

Web Summary : Six individuals were defrauded of ₹73 lakh in a flat purchase scam in Andheri. Balu Shete filed a police complaint against multiple individuals, including developers and landowners, alleging conspiracy and fraud after failing to receive possession of the flat despite payments.
टॅग्स :धोकेबाजी