समुद्रात डिझेलची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक
By Admin | Updated: December 3, 2015 02:21 IST2015-12-03T02:21:19+5:302015-12-03T02:21:19+5:30
परदेशी जहाजांवरील डिझेलची चोरी करून त्याची विक्री करणारे रॅकेट यलो गेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. तस्करी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून ३१ लाख

समुद्रात डिझेलची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक
मुंबई : परदेशी जहाजांवरील डिझेलची चोरी करून त्याची विक्री करणारे रॅकेट यलो गेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. तस्करी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून ३१ लाख रुपये किमतीचे डिझेल व दोन बोटी जप्त केल्या आहेत. यासीन लकडावाला (वय २८), मोनू सिंह (२६), मोनरुल मंडल (२५), नौशाद कुरेशी (३९), अकबर सुबनिया (४८) आणि अरिफ बाया (२४) अशी त्यांची नावे आहेत.
माझगाव डॉक परिसरात काही इसम मोठ्या प्रमाणात डिझेलची तस्करी करत असल्याची माहिती फोर्ट झोनच्या पोलीस उपआयुक्तांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते पथकासह फिश जेटी परिसरात गेले. या ठिकाणी दोन नौका संशयास्पद फिरताना आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी या नौका बाजूला घेतल्या असता यावर अनेक डिझेलचे टँक पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या बोटींवर काम करणाऱ्या इसमांकडे चौकशी ेकेली असता त्यांनी हे डिझेल एका विदेशी जहाजामधून काढल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत यामध्ये या सहा जणांना अटक केली. तसेच या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या दोन बोटीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)