मुंबई : बी. डी. डी. चाळ, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प, जी. टी. बी. नगर येथील पंजाबी कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदय नगर, जोगेश्वरीतील पूनम नगर, अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर, वरळी आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प असे अनेक प्रकल्प अंमलबजावणीच्या किंवा नियोजनाच्या टप्प्यात आहेत. या प्रकल्पांसह विविध प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील घरातील संख्येत सुमारे सहा लाख नवीन घरे जोडली जातील, अशी अपेक्षा म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केली.
१६ हजार कुटुंबांना आधुनिक घरे
संजीव जयस्वाल म्हणाले, बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे १६ हजार कुटुंबांना आधुनिक घरे विनामूल्य मिळणार आहेत. गोरेगाव येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरणार असून, १,६०० चौरस फुटांची घरे त्यामध्ये दिली जाणार आहेत.
ओकामुरा टोमोहीतो म्हणाले, शहरी विकास उपक्रमांना जपानकडून पाठिंबा दिला जाईल. मुंबईत पुनर्विकास व क्लस्टर विकास प्रकल्पांमध्ये आमची सहकार्य करण्याची इच्छाही आहे.
५०० चौरस फुटांची घरे मोफत
शिष्टमंडळाने कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाबद्दलही विशेष रस दाखवला. हा प्रकल्प १०० वर्षांहून अधिक जुन्या व मोडकळीस आलेल्या वसाहतींचे रूपांतर करून आधुनिक आणि भविष्याभिमुख शहरी परिसर निर्माण करणार आहे.
प्रकल्पांतर्गत ८ हजार कुटुंबांना प्रत्येकी ५०० चौरस फुटांची घरे मोफत देण्यात येणार असून, त्या परिसराचा ऐतिहासिक वारसा जपला जाणार आहे.
Web Summary : Maharashtra plans to add six lakh new homes through various projects, including BDD chawls redevelopment. 16,000 families will receive free modern homes. Kamathipura cluster redevelopment will provide 500 sq ft houses to 8,000 families, preserving heritage.
Web Summary : महाराष्ट्र में बीडी डी चॉल पुनर्विकास सहित विभिन्न परियोजनाओं के माध्यम से छह लाख नए घर जोड़े जाएंगे। 16,000 परिवारों को मुफ्त आधुनिक घर मिलेंगे। कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास 8,000 परिवारों को 500 वर्ग फुट के घर देगा, विरासत का संरक्षण करेगा।